मटार आणि ढोबळी मिरचीची चटणी


मागच्या आठवड्यात मी पराठे बनवताना फ्रीजमध्ये मिरची नसल्यानी ढोबळी मिरची वापरण्याचे थरवले. मिक्सरमध्ये ते वाटल्यानंतर मला मटार वापरण्याचे सुचले. पहिला पराठा तयार होताच आम्ही चव बघितली आणि तो एकदम छान कुरकुरीत आणि चटपटीत होत. पण नंतर जेवायला बसे पर्यंत पराठे मऊ झालेले आणि ते खाणे सोपे नव्हते. मी संध्याकाळी उरलेलं मिश्रण सॅन्डविचमध्ये काकडी आणि टोमाटो बरोबर वापरले. ब्रेड बरोबर ह्या चटणीची चव एकदम निखारून आली. माझ्यामते हि चटणी ब्रेड, बर्गर किंवा अशीच चटणी म्हणून जास्त चांगली आहे.

मटार आणि ढोबळी मिरचीची चटणी
साहित्य
२ वाटी मटार
१ ढोबळी मिरची
१ लिंबू
४ लसूण पाकळ्या
मुठभर कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
मीठ

कृती
  • लिंबू मिक्सर मध्ये पिळणे.
  • त्यात चिरलेली ढोबळी मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर घालून बारीक वाटणे
  • त्यात मटार, तिखट, धने पूड घालून बारीक वाटणे.

टीप
मी फ्रोझन मटार वापरले पण ताजे मटार वापरायला हरकत नाही
मी हीच चटणी पुन्हा बर्गरसाठी बार्बिक्यूच्या दिवशी वापरली आणि सगळ्यांना हि चटणी एकदम आवडली

काजू कतली


मी हे बरेच दिवसांपासून बनवण्याचा विचार करत होते. साधारण २ वर्षांपूर्वी दिवाळीला आई बाबा इथे असताना बनवलेले. त्यानंतर मी त्याविषयी विसरूनच गेलेले. २-३ आठवड्यांपूर्वी अजॉयनी काजू कतली बनवायची मागणी केल्यावर मला तर भीती होती कि आधीच मी सगळ विसरूनच गेले असेन पण आईला पाठवलेल्या कच्या नोट्समध्ये माहिती मिळाल्यानंतर ह्यावेळी एकदम छान झालेले. ह्यावेळी फोटो काढायला पण विसरले नाही त्यामुळे हि कृती लिहायला काही कमी नाहिये. माझ्यामते हि सगळ्यात सोपी आणि खूप वाहवा देणारी दमदार कृती आहे.

काजू कतली
साहित्य
६ वाटी काजू
१ वाटी दुध पूड
२ वाटी साखर
चिमुटभर वेलची
चांदीचा वर्ख

कृती
  • काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून पूड करणे
  • काजू पूड आणि दुध पूड एकत्र करणे
  • तवा चांगला गरम करणे व आचेवरून बाजूला काढणे
  • काजू पूड आणि दुध पूड तव्यावर घालून कोमट होईपर्यंत चांगले एकत्र करणे व नंतर भांड्यात काढणे
  • १.५ वाटी पाणी आणि साखर एकत्र गरम करून २ तारी पाक बनवणे
  • वेलची पूड आणि पाक काजू मिश्रणामध्ये घालून चांगले ढवळणे व नंतर माळून गोळा बनवणे
  • बेकिंग तवा किंवा ताटलीवर बटरपेपर ठेवून त्यावर हे मिश्रण घालून जोरात थापून पसरवणे
  • त्यावर चांदीचा वर्ख लावून २-३ तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • काजू कतली कापून खायला देणे

टीप
साखरेचा पाक बरोबर बनवणे आणि चांगले मळणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे
मिश्रण पसरवताना चांगले जोरात ठोकून पसरवल्यानी काजू कतली एकदम चांगली सेट होते

चॉकलेट कपकेक


एकादिवशी असच काहीतरी बेकिंग करायचा म्हणून केलेला हा प्रयोग. बरेच दिवसांपासून फ्रीजमध्ये असलेल्या बटर आयसिंगचा एकदम मस्त उपयोग आणि ते केक बरोबर एकदम छान लागले

चॉकलेट कपकेक
साहित्य
2 वाटी साखर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स
१ अंडे
१/२ वाटी तेल
१ वाटी दुध
१.७५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
१ चमचा बेकिंग पूड
१ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा मीठ
२ चमचे इन्स्टण्ट कॉफी

कृती
  • ओव्हन 3२५F/१६०C वर गरम करणे
  • अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटणे
  • त्यात तेल आणि दुध घालून मध्यम वेगात मिश्रण फेटून घेणे
  • मैदा, कोको पूड, बेकिंग पूड आणि बेकिंग सोडा २-३ वेळा चाळून घेणे
  • चाळलेले पीठ अंडी-तेल-दुधाच्या मिश्रणात घालून २ मिनिट कमी वेगावर फेटणे
  • १ वाटी पाणी आणि कॉफी एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट गरम करणे
  • कॉफी केकच्या मिश्रणात घालून मध्यम वेगात २ मिनिट फेटणे
  • कपकेकच्या भांड्यात १४ लायनर घालून त्यात ३/४ पातळीपर्यंत भरणे
  • ओव्हनमध्ये १८ मिनिट भाजणे.
  • केक कमीत कमी १ तास थंड होऊ देणे मग केकवर फ्रॉसटिंग आणि फिलिंग घालून केक खायला देणे

टीप
मी फिलिंग नाही वापरले पण चॉकलेट गनाश एकदम चांगले जाइल
मी आधी बनवलेले चॉकलेट बटरक्रीम फ्रॉसटिंगसाठी वापरले

चॉकलेट बटरक्रीम


साधारण ३ वर्षांआधी मी विल्टनचा केक डेकोरेशनचा क्लास केलेला. त्यात बरेच डेकोरेशन आणि आयसिंग बनवायला शिकवलेल. हे चॉकलेट क्रीम मी तीच कृती थोडी बदलून केलय.

चॉकलेट बटरक्रीम
साहित्य
२ वाटी डालडा
१.५ वाटी कोको पूड
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१ चमचे दुध
४५० ग्राम आयसिंग शुगर
चिमुटभर मीठ

कृती
  • डालडा, इसेन्स आणि दुध एकत्र करणे
  • आयसिंग शुगर आणि कोको पूड एकत्र चाळून घेणे
  • ते डालडात घालून ते सगळे एकजीव होईपर्यंत एकत्र फेटणे
  • मीठ घालून अजून २ मिनिट क्रिमी होईपर्यंत फेटणे

टीप
क्रीम साधारण अर्धा वर्ष फ्रीजमध्ये एअर टाईट डब्ब्यात राहू शकते

फिश कबाब


मागच्या रविवारी मी संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी बनवायचे म्हणून हे कबाब बनवलेले. एकदम लवकर आणि छान झालेले.

फिश कबाब
साहित्य
२ माश्यांचे तुकडे (साधारण १८० ग्राम काट्या विना)
१ कांदा
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
१/४ चमचा तिखट
१ हिरवी मिरची
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१/४ चमचा लवंग पूड
१/२ चमचे धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ वाती कोथिम्बिर
४-५ छोट्या ढब्बू मिरच्या
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
  • माश्याचे तुकडे कुस्करून त्यात मिरे पूड, तिखट, दालचिनी पूड, लवंग पूड, धने पूड, गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करणे
  • त्यात बारीक चिरून कांदे, ढब्बू मिरच्या, हिरवी मिरची आणि कोथिम्बिर घालणे
  • त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकत्र करणे व कबाबचे गोळे बनवणे
  • तवा गरम करून त्यावर तेल व कबाब घालून सर्व बाजूनी गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतणे

टीप
मी ह्यावेळी माशे मायक्रोवेव्हच्या ऑटो डिफ़्रोस्ट केलेले आणि ते एकदम ५ मिनिटात शलेले. नेहमीसारखे १५ मिनिट वाट बघत बसावे लागले नाही ते सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही खूप भुकेले होतो.
हे नाश्त्यासाठी, स्टार्टरम्हणून, साईड डिशम्हणून किंवा पावात घालून पण खायला देत येतिल.

हराभरा कबाब


मी हे कबाब शनिवारी बनवलेले आणि माझ्या मते आधीच्या पेक्षा हे जास्त छान होते. बर्याच जणांनी ह्याची कृती मागितली म्हणून मी इथे देत आहे.

हराभरा कबाब
साहित्य
६ वाटी मटार
२ मोठे बटाटे
१.५ वाटी पनीर
३ मुठभर पालकाची पाने
२ मुठभर कोथिंबीर
१ मुठभर पुदिना
३ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
२ चमचे चाट मसाला
१ चमचा आमचूर पूड
१/४ वाटी ब्रेडक्रम्बस
१ वाटी काजू
मीठ
तेल

कृती
  • बटाटे कुकरमध्ये उकडून थंड करणे. साले काढून किसून एका मोठ्या भांड्यात घालणे.
  • ४ वाटी मटार मायक्रोवेव्ह मध्ये ३ मिनिट शिजवून घेणे.
  • शिजलेले मटार आणि पालक मिक्सरमध्ये घालून बारीक वाटणे.
  • त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून आणखी वाटणे व बटाटे घातलेल्या भांड्यात ओतणे.
  • त्यात किसलेले पनीर, चाट मसाला, आमचूर पूड आणि ब्रेडक्रम्ब्स घालून एकत्र करणे.
  • उरलेले २ वाटी मटार मायक्रोवेव्ह करून मिश्रण घालून एकत्र करणे.
  • मिश्रणाचे छोटे गोळे बनवून त्यावर काजू दाबून लावणे. मध्यम आचेवर तेल घालून तव्यावर दोन्हीबाजूनी गडद लाल होईपर्यंत भाजणे

टीप
मिश्रण लगेच वापरल्यावर थोडे चिकट वाटत होते पण मी उरलेले मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले व दुसऱ्यादिवशी लगेच गोळे करून तव्यावर घातले. तेंव्हा ते जास्त चिकटत नव्हते आणि कबाब भाजायला सोप्पे झाले.
हि कृती मी सानेहामिच्या ४ जणांच्या हिशोबाऐवजी १२ लोकांच्या हिशोबानी स्तर्तार म्हणून केलेली
मी ह्यात ताजे पनीर बनवून वापरले. १ लिटर २% रिड्युस्ड फट दुध उकळवून त्यात एका लिंबाचा रस घालून ढवळणे. दुध फाटल्यावर ते पंच्यावर ओतून त्यातले पाणी काढून तयार झालेले पनीर हातानी कुस्करून मिश्रांत घातले.

फिश तवा फ्राय


आम्ही तिलापिया माशे आणायला चालू केल्यापासून मी नेहमीच त्यांना ग्रील करत आलीये. मला माशे नेहमीच आवडायचे आणि आता इतक्या दिवसात मी माश्याची आमटी बनवलीच नव्हती. जास्त नारळाचा वापर करायचा नाही अस ठरवल्यानी मला नेहमी बनवतात तशी आमटी बनवायची नव्हती. हि आमटी एकदम मस्त झालेली आणि मला साधारण १० वर्षांपूर्वी बऱ्याच वेळी खायचे त्या नंदिनी नावाच्या बंगलोरमधल्या आंध्रा करीची आठवण झाली.


फिश तवा फ्राय
साहित्य
५०० गरम माशे
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा चिंच
१/२ चमचा मिरे
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
कोथिंबीर पाने

कृती
  • माश्याला १/४ चमचे तिखट, धने पूड आणि मीठ लावून बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये चिंच, कांदा आणि ६-७ मिरे बाजूला ठेवून बाकीचे मिरे घालून बारीक वाटणे
  • तवा गरम करून त्यात माश्याचे तुकडे घालणे व एक मिनिट शिजू देणे.
  • माशे परतून त्यांना अजून एक मिनिट शिजू देणे. ताटावर काढून ठेवणे.
  • त्याच तेलात वाटलेली कांद्याची पेस्ट घालून त्यातील कच्चा वास निघे पर्यंत परतणे.
  • बाजूला टोमाटो , लसुन, आले बारीक वाटून घेणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात टोमाटो पेस्ट, जिरे पूड, गरम मसाला, हळद, उरलेले मिरे आणि मीठ घालून ५ मिनिट सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात परतलेले माशे घालून अलगत एकत्र करणे व २-३ मिनिट शिजवणे.
  • वरून बारीक चिरलेली कोथिम्बिर घालून वाढणे.

टीप
मी काटे नसलेले व साफ केलेले तिलापिया माश्याचे तुकडे साधारण ४ भागात चिरलेले वापरले पण कुठलाही बिन काट्याचा मासा वापरता येईल.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP