अंड्याचा रोल
अंड्याचा रोल बंगाली खाण्यात इतका महत्वाचा आहे ह्याची मला बिलकुल कल्पना नव्हती :) इथे पूजेसाठी आम्ही गेले होतो तेंव्हा बऱ्याच लोकांना ह्यासाठी रांगेत उभे राहिलेले बघितले. अजॉय आधी कधी रोल बनवायला सांगितला की मला वाटायचे ह्याला तर पराठा जास्त आवडतो पण असे म्हणता येईल की तेंव्हा मला रोलचे महत्व कळले नव्हते पण इथली पूजा बघितल्यावर पहिल्यांदा मी रोल बनवले. अजॉय एकदम खुश होता :)
साहित्य
३ वाटी मैदा
१ चमचा गव्हाचे पीठ
३ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
हॉट आणि स्वीट टोमाटो सॉस
मीठ
तेल
कृती
- मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि चमचाभर तेल एकत्र करून पाणी घालुन पीठ मळणे. भिजण्यासाठी अर्धा तास ठेवणे.
- कढईत थोडेसे तेल घालुन गरम करणे व त्यात उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालुन शिजवणे.
- भिजलेल्या पीठाचे ३ गोळे करून पातळ चपाती लाटणे,
- तवा गरम करून त्यावर चपाती टाकणे व तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे
- दुसरी बाजू हॉट आली की त्यावर अंडे फोडणे व पसरवणे
- एक दोन मिनिट शिजू देणे व परतणे. तेल सोडून अंडे शिजेपर्यंत भाजणे व टिश्यूवर काढणे.
- कांद्याचा १/३ भाग व सॉस उभ्या रेषेत चपातीवर घालणे.
- चपाती टिश्यू सकट खालच्या बाजूनी थोडीशी दुमडून नंतर त्याचा रोल करणे.
टीप
मी पूर्ण गव्हाचे पीठ न वापरता मैदापन वापरला त्यामुळे चपाती कडक होत नाही आणि अगदी चपाती चपाती सारखी लागत नाही
रोल बनवताना एका बाजूनी मिश्रण झाकले जाईल असे दुमडावे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी घट्ट बांधावे म्हणजे रोल सुटत नाही व मिश्रण बाहेर येणार नाही