साबुदाणा थालीपीठ
हा अजून एक साबुदाण्याचा पदार्थ जो सगळ्यांना फार आवडतो. बरीच मुल ह्यासाठी उपवास पण करून टाकतात. (त्यात मी पण आहे :) )
साहित्य
१ वाटी साबुदाणा
१/२ वाटी शेंगदाणा कुट
३-४ हिरवी मिरची
१/२ चमचा जीरा
४ चमचे कोथिंबीर
२ मध्यम आकाराचे बटाटे
१/२ चमचा साखर
मीठ
तेल/तूप/लोणी
कृती
- साबुदाण्यात १/४ वाटी पाणी घालुन कमीत कमी २-३ तास भिजवणे.
- बटाटा उकडून व किसून घेणे.
- जीरा, मीठ, साखर, शेंगदाणा कुट, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर साबुदाण्यात घालुन एकत्र करणे
- त्यात किसलेला बटाटा घालुन पीठ मळणे
- पिठाचा मोठा गोळा घेऊन तव्यावर थालीपीठ थापणे.
(ज्यांना थालीपीठ कसे थापायचे माहित नाही त्यांच्या करता - तव्यावर मध्ये तेल/तूप/लोणी घालणे. त्यावर गोळा ठेवून त्याला तळहातानी थापत पसरवणे.) - मध्यम आचेवर थालीपिठावर झाकणी ठेवून खालची बाजू पूर्ण शिजेपर्यंत भाजणे.
- थालीपीठ परतून झाकणी न ठेवता हि बाजुपण शिजेपर्यंत भाजणे.
- थालीपीठाचे ४ तुकडे करून दह्याच्या चटणीबरोबर खायला देणे.
टीप
हिरव्या मिरचीऎवजी तिखटपण वापरता येईल. चव थोडीशी वेगळी होईल.
आधी साबुदाण्याच्या वड्याच्या पाककृतीत सांगितल्याप्रमाणे साबुदाणा भिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण महत्वाचे आहे.
मी ह्यात कोथिंबीरच्याऎवजी अर्धा चमचा धने पूड पण वापरलेली कारण माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नव्हती पण कोथिबीरमुळे थालीपीठ एकदम सुंदर दिसते व जास्त चविष्ठ होते.