मसालेदार ग्रिल्ड तिलापिया
हा माश्याचा प्रकार मी कधी बनवला नव्हता पण बरेच महिने झाले मी माशे खाले नाहीयेत. मला माझ्या आहारात बाकीच्या मांसाहारी प्रकाराऐवजी (चिकन, कोळंबी किंवा खेकडे) भाज्या आणि माशे वापरण्याची इच्छा आहे म्हणून मग कॉस्टकोमधून काल हा मासा आणल्यावर मी काळाच्या बर्बिक्यूसाठी त्यांना ग्रील केले.
साहित्य
२ तिलापिया माश्याचे तुकडे
१ चमचा तिखट
३/४ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/२ लिंबू
मीठ
तेल
कृती
- मध्याला मीठ, तिखट, जिरे पूड, गरम मसाला आणि लिंबाचा रस लावणे.
- मसाले आणि लिंबाचे मिश्रण माश्याला चांगले चोळून १-२ मिनिट मसाज करणे व ४५ मिनिट ते तासभर बाजूला ठेवणे.
- ग्रील गरम करून त्यावर तेलाचा स्प्रे माश्याच्या दोन्ही बाजूला मारून त्याला ३-४ मिनिट प्रत्र्येक बाजूनी ग्रील करणे.
टीप
जर ग्रील नसेल तर तव्यावर मध्यम आचेवरसुद्धा मासा भाजत येईल
मी ह्याला बागेतल्या ताज्या पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला दिला आणि स्टार्टर सारखा वाढला. पण जास्तीत जास्त मीच खाला :) शेवटी अर्धा मासा बाजूला कसाबसा ठेवला आजच्या जेवानास्ठी. तो मी सलाड मध्ये पुदिना चटणीचे ड्रेसिंग आणि मासा घालुन खातीये.