केशर पिस्ता आईस्क्रीम
बाबांचं एकदम आवडते आईस्क्रीम. मी लहान असताना मला फार काही आवडायचा नाही. तेंव्हा मला अंजीर आईस्क्रीमसाठी फार वेडी होते आणि बहुतेक वेळा तेच खायचे. पण ह्या थोड्या वर्षात मला केशराची फार आवड निर्माण झालीये. त्यानी जो रंग येतो, त्याची चव सगळेच एकदम मस्त. आई बाबा इकडे आलेले तेंव्हा मी हे आईस्क्रीम बनवलेले. तेंव्हा फोटो काढायला नव्हता जमला पण आज पहिल्यांदा फोटो काढला.
साहित्य
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
१ वाटी पिस्ता
२ वाटी साखर
१/४ चमचा केशर
कृती
- अर्धा लिटर दुध साखर घालुन मिक्सर मध्ये घुसळून घेणे.
- एका भांड्यात एक कप दुध घेवून उकळवणे. त्यात केशर घालुन चांगले पिवळे होईपर्यंत हलवणे.
- उरलेले दुध व केशर घातलेले दुध गोड केलेल्या दुधात घालुन चांगले एकत्र करणे.
- मिक्सरमध्ये पिस्ता पूड करून घेणे व दुधात घालणे.
- दुधात क्रीम घालुन चांगले एकत्र करणे. मिश्रण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी एक तास भर ठेवणे.
- मिश्रण आईस्क्रीममेकरमध्ये घालुन सेट करणे.
टीप
दुध उकळवून त्यात केशर घालणे एकदम महत्वाचे आहे नाहीतर केशरची चव आणि रंग येणार नाही.
तसेच मिश्रण आईस्क्रीममेकरमध्ये घालण्या आधी थंड नाही केलेतर सेट होणार नाही
hello, what is icecream maker? Can we make it in refrigerator?