हरबरा डाळ वडा आणि डोसा
आज काहीतरी वेगळे करून बघण्याचा माझा विचार होता. थोड्या आठवड्यांपूर्वी अशीच कुठलीतरी कृती वाचलेली आणि त्यांनीच प्रेरित होऊन मी हे वडे बनवले. संध्याकाळी त्याच पीठाचे डोसे बनवले आणि ते सुद्धा तितकेच चांगले झालेले.
हरबरा डाळ वडा
हरबरा डाळ डोसा
साहित्य
२.५ वाटी हरबरा डाळ
४ चमचे हिरव्या मिरच्या
४ चमचे कोथिंबीर
४ चमचे पुदिना
४ लसूण पाकळ्या
मीठ
तेल
कृती
- हरबरा डाळ रात्रभर भिजवून ठेवणे.
- सकाळी मिक्सरमध्ये डाळ, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मीठ एकत्र बारीक वाटणे.
- वड्यासाठी: गरम तेलात चमचाभर पीठ टाकून मध्यम आचेवर दोन्हीबाजुनी गुलाबी होईपर्यंत तळणे.
- डोश्यासाठी: पिठात थोडे पाणी घालुन पातळ करणे व तेल लावलेल्या गरम तव्यावर ओतून पसरवणे. दोन्हीबाजुनी गुलाबी होईपर्यंत भाजणे.
टीप
वडे बनवायचे असल्यास डाळ वाटल्यावाटल्या लगेच तळणे नाहीतर वडे तेल जास्त शोषून घेतात, खर सांगायच झाल तर मी त्यामुळेच संध्याकाळी उरलेल्या पीठाचे डोसे बनवले.
0 comments:
Post a Comment