मेथी कॉर्न आप्पे
हि डीश मी आधी पोस्ट केलेल्या कॉर्न आप्पेच्या कृतीवरून प्रेरित होऊन बनवलीये. थोडी वेगळी चव देण्याच्या प्रयत्नात हा प्रकार पण छान झालेला :)
साहित्य
४ वाटी स्वीटकॉर्न
२ वाटी रवा
४ हिरव्या मिरच्या
१ वाटी मेथी
१ वाटी कोथिंबीर
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा इनो
मीठ
तेल
कृती
- मिक्सरमध्ये कॉर्न आणि हिरव्या मिरच्या एकत्र बारीक वाटून घेणे.
- त्यात मीठ, रवा, लसूण पेस्ट घालुन चांगले ढवळणे.
- त्यात बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर घालुन मिसळणे.
- मिश्रणात इनो घालुन चांगले ढवळणे.
- आप्पे पात्र गरम करून त्यात तेलाचा थेंब घालुन चमचाभर मिश्रण घालणे.
- आपे गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर भाजणे, परतून दुसरी बाजूपण गुलाबी करणे.
टीप
जर फ्रोझन कॉर्न वापरले तर मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिट गरम करणे म्हणजे वाटायला एकदम सोप्पे होईल
Hi Sheetal. Kupach chan ani uncommon receipes aahet hya. Mala nakkich karayala aawadtil. Keep on posting new receipes. - Dipti Khedekar
Nice receipes
@Dipti
Thank you so much
Thanku so much sheetal.vitthal kamat pramane tu mala watate