वांग्याची भजी


भजी हा प्रकार महाराष्ट्रात फार प्रसिद्ध. लग्न असू वा घरी बोलवलेले पाहुणे, भजी पाहिजेच. आमच्याकडे भजी करून फार दिवस झाले असा लक्षात येत मी सोमवारी भजी बनवण्याचे ठरवले. पण मग वांगे बघून थोडा नवीन प्रयोंग करूया अस ठरवलं. प्रयोग एकदम यशस्वी त्यामुळे इथे पाककृती देतीये.

वांग्याची भजी
साहित्य
२ वाटी चिरलेले वांगे
१ कांदा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
१/२ वाटी बेसन
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • चिरलेले वांगे, कांदा, तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, मीठ, बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे. थोडे पाणी वापरून भजीचे पीठ बनवणे.
  • तेल गरम करणे. त्यातील २ चमचे तेल भजीच्या पिठात घालुन चांगले मिसळणे.
  • छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून तळहातावर दाबणे.
  • तेलात भजी दोन्ही बाजूनी होईल अशी भाजून गरम गरम खायला देणे.

टीप
मी नेहमी भजीच्या पीठाचे सगळे साहित्य एकत्र करून पाणी घालायच्या आधी ५ मिनिटे वाट बघते. त्यामुळे भाज्यांचे पाणी तेवाध्यावेलात सुटते व नंतर पीठ पातळ होण्याचा प्रश्न येत नाही.

व्हॅनिला आईस्क्रीम


अजॉयचा आवडता आईस्क्रीमचा फ्लेवर. मागच्या शनिवारी जेवणानंतर मी तो बनवला. इतका उत्कृष्ठ आणि सोपा होता की मी तो अजून पर्यंत एकदाही का नाही बनवला असाच विचार मनात येतो.

व्हॅनिला आईस्क्रीम
साहित्य
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
२ वाटी साखर
१/४ वाटी व्हॅनिला इसेन्स

कृती
  • मिक्सरमध्ये साखर आणि अर्धा लिटर दुध साखर विरघळेपर्यंत फिरवणे.
  • एका भांड्यात दुध-साखर मिश्रण, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फोर्कवापरून फेटणे.
  • आईस्क्रीममेकरमध्ये मिश्रण घालुन आईस्क्रीममेकरच्या सूचनेप्रमाणे सेट होण्यासाठी ठेवणे.

टीप
मी आईस्क्रीममध्ये हेवी व्हिपिंग क्रीम वापरले. जर लाईट व्हीप्पिंग क्रीम वापरायचे असेल तर साधारण ४.५ वाटी वापरावे लागेल.

पायेश


मी आधी पण हि डीश बनवली होती पण आज मिलिंद आणि अजॉयसाठी पुन्हा बनवल्यावर फोटो काढून रेसिपी लिहायचे ठरवले. अजॉयचा आवडता गोड पदार्थ आणि इतके सोप्पे

पायेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी तांदूळ
१.२५ वाटी गुळ

कृती
  • दुध उकळवून ३/४ होईपर्यंत आटवणे
  • तांदूळ धुवून उकळत्या दुधात घालुन भात शिजेपर्यंत उकळवणे
  • गॅसवरून उतरवून त्यात बारीक चिरलेले गुळ घालणे.
  • गुळ विरघळेपर्यंत ढवळणे. थंड करून खायला देणे.

टीप
दुध आणि भात मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे म्हणजे पायेश करपणार नाही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP