तंदुरी गोबी
आज ऑफिसमध्ये मिटिंगच्या आधी सगळेजण बर्बिक्यूविषयी चर्चा करत होते. तेंव्हापासून मला तंदुरी खाण्याची फार इच्छा होत होती. फ्रीजमध्ये गोबी असल्यानी मी तंदुरी गोबी बनवण्याचे ठरवले. रात्रीचे जेवण त्यामुळे एकदम चविष्ठ होते.
साहित्य
१ कॉलीफ़्लॉवर
१ वाटी दही
१.५ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा तंदुरी मसाला
१ चमचा चाट मसाला
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे आल्याचे तुकडे
१० लासुणाच्या पाकळ्या
तेल
मीठ चवीपुरते
कृती
- कॉलीफ़्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात घालावे. ७ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. पाणी गाळून बाजूला ठेवणे.
- मिक्सरमध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि २ चमचे दही घालुन बारीक वाटणे.
- एका बावुलमध्ये वाटलेली पेस्ट, उरलेले दही, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, हळद, तंदुरी मसाला आणि मीठ घालुन ढवळणे.
- त्या मिश्रणात कॉलीफ़्लॉवरचे तुकडे खालून मिसळणे. फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास ठेवणे.
- तवा गरम करून त्यात थोडे तेल घालणे. कॉलीफ़्लॉवरचे तुकडे त्यावर पसरवून मध्यम आचेवर पूर्ण पणे होईपर्यंत शिजवणे. कॉलीफ़्लॉवरच्या तुकड्यांना परतवून दुसरी बाजू पूर्ण होईपर्यंत शिजवणे. असे सगळ्या बाजूला भाजून झाल्यावर ताटलीत काढणे.
- चाट मसाला शिंपडून पुदिना चटणी, कांदा आणि लिंबूबरोबर खायला देणे.
टीप
मी ५ मिनिटच कॉलीफ़्लॉवरचे तुकडे शिजवलेपण माझ्यामते ७ मिनिट बरोबर होईल.
स्क्युवरमध्ये ३-४ तुकडे घालुन कॉलीफ़्लॉवरला बार्बिक्यू पण करू शकता
0 comments:
Post a Comment