शुगर फ्री खजूर आणि बदाम लाडू
काल मी मॅक्रून्स बनवण्यासाठी बदामाची पूड करायला घेतली पण कश्यामुळे माहिती नाही पण त्यात थोडा ओलसरपणा आला. मग मी अजॉयला नवीन बदाम आणायला पाठवून त्या वेळात हे लाडू बनवले. खूपच चविष्ठ आणि बिन साखरेचे हे लाडू उत्तम झालेत.
साहित्य
२ वाटी बदाम
१ वाटी खजूर
३-४ चमचे मनुके
कृती
- बदामाची पूड करणे.
- बदामाच्या पुडीचे २ भाग करणे. प्रत्येक भागात अर्धा कप खजूर घालुन मिक्सर मध्ये बारीक वाटणे.
- तयार झालेले मिश्रण चांगले मळून घेणे. प्रत्येक लाडूच्या मध्ये १-२ मनुके घालुन छोटे छोटे लाडू वळणे.
टीप
मी खजुराचा गोडपणा बदामाबरोबर वापण्याचा विचार करून साखर किंवा गुळ ह्या लाडूत वापरले नाही. मला साधारण थोडे कमी गोड असलेले पदार्थ आवडतात त्यामुळे हे लाडू माझ्या चवीनुसार बरोबर झालेले. पाहिजे असल्यास थोडी साखर घालुन अजून थोडे अजून गोड करता येईल
0 comments:
Post a Comment