लीची आईसक्रिम
इथे बहुतेक सगळ्या दुकानात कॅनमेध्ये लीची मिळते पण ताजी लीची मी कधीच दिसली नाही. शेवटी मागच्या महिन्यात मी तो डब्बा वापरून बघण्याचे ठरवले. डब्यातले पाणी पण वापरले तर बर्यापैकी चांगली चव येते.
साहित्य
१ सीडलेस लीचीचा डब्बा
१/२ वाटी साखर
१/२ वाटी दुध
३.५ वाटी क्रीम
१ लिंबू
कृती
- लीची पाकातून बाजूला काढून तो पाक मिक्सर मध्ये घालणे.
- त्यात साखर आणि दुख घालुन साखर विरघळेपर्यंत वाटणे
- त्यात क्रीम आणि लिंबाचा रस घालुन फेटणे.
- आईस्क्रीममेकर मध्ये हे मिश्रण घालुन सेट होण्यासाठी ठेवणे.
- लीची बारीक चिरून आईस्क्रीममध्ये ते सेट होण्याच्या ३-४ मिनिटाच्या आधी घालणे.
टीप
जर ताजे लीची वापरायचे असेल तर साधारण ३० लीची वापरणे. अंदाजे १५ लीची २ वाटी पाणी घालुन वाटणे आणि पाकच्या ऎवजी वापरणे. उरलेल्या १५ लीचीना बारीक चिरून वापरणे. तसेच साखरपण अंदाजे २/३ वाटी लागेल.
लिंबू वापराल्यानी लीचीची चव निखरून येते
0 comments:
Post a Comment