पनीर
आज काल इथे मिळणाऱ्या पनीरची क्वालिटी फारच बेकार झालीये, इतकी की पनीर हा नावडता पदार्थ बनू लागला आहे. पण ते बिलकुल चांगले नाहीये कारण अजॉय आणि मला दोघानाही पनीरचे पदार्थ फार आवडतात. असे नाहीये की मी कधी पनीर बनवले नाहीये. गोड पक्वान्नांसाठी मी नेहमीच पनीर घरी ताजे बनवत आलेत पण आता मी भाजीसाठी पण पनीर घरी करायला चालू केलेय. आणि तेंव्हा पासून मला असं लक्षात आलय की मी मागचे २-३ वर्ष बराच काही मिस केलय
साहित्य
२ लिटर दुध
३ चमचे व्हिनेगर
कृती
- दुध उकळवणे.
- व्हिनेगर एक कपभर पाण्यामध्ये मिसळून दुधात घालणे. दुध भरपूर ढवळणे.
- दुधापासून पनीर बाजूला होईल आणि पातळ पाणी दिसू लागेल.
- हे मिश्रण चाळणीमध्ये पंचा पसरवून त्यावर ओतणे.
- थंड पाणी सोडून तयार पनीर चांगले धुवून घेणे.
- पंचा घट्ट बांधून त्यावर पाणी भरलेला कुकर रात्रभर ठेवणे. सकाळी पंचा उघडल्यावर पनीरचा घट्ट तुकडा जमा झालेला असेल.
टीप
बरेच लोक व्हिनेगरच्याऎवजी लिंबाच्या रसाचा वापर करतात पण मला व्हिनेगर वापरायला आवडत कारण त्याचा वास आणि चव पाण्यानी धुतलं की लगेच निघून जाते.
पनीर बनवण्यासाठी हाफ अॅन्ड हाफ वापरू नये अथवा पनीर खूप जास्त क्रिमी होईल. दुध किंवा रेड्युस्ड फ़ॅट दुध वापरणे एकदम उत्तम