अख्या मसाल्याचा व्हेज पुलाव
मला मिरे फार आवडतात फक्त पूड नाही तर पापडत असतात तसे तुकडे सुद्धा. इथे आल्यापासून आम्ही गार्लिक पापडच खातोय कारण अजॉयला तोच आवडतो आणि मला दोन प्रकारचे पापड खायला द्यायला कंटाळा येतो. म्हणूनच मिरे खाण्यासाठी मी हि पाककृती तयार केली :)
साहित्य
२.५ वाटी तांदूळ
२ वाटी फ्लॉवर
२ कच्ची केळी
१ मध्यम आकाराचे वांगे
१ बटाटा
१ वाटी मटार
१/२ चमचा मिरे
१/२ चमचा जीरा
४-५ लवंग
४-५ वेलची
चिमुटभर केशर
मीठ
तेल
तूप
कृती
- एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ घालुन भात तयार व्हायच्या थोडावेळ आधी शिजवणे.
- उरलेले पाणी काढून टाकून भात बाजूला ठेऊन देणे.
- कढईमध्ये तेल तापवून त्यात फ्लॉवर, वांग्याचे तुकडे आणि कच्या केळ्यांचे तुकडे घालुन भाजून घेणे.
- मटार भाजून त्यांना पण बाजूला ठेवणे.
- बटाटा किसून थोडा थोडा एकत्र करून भाजून घेणे
- कढईमध्ये तूप घालुन त्यात लवंग, वेलची, मिरे, जीरा घालुन फोडणी करणे.
- त्यात भात, फ्लॉवर, वांग्याचे आणि केळ्यांचे तुकडे घालणे. एकत्र करून २-३ मिनिट वाफ काढणे.
- एक चमचा गरम करून त्यावर केशर चुरून भाजणे. केशर भातात मिसळणे
- मीठ घालुन भात एकत्र करणे व अजून १ मिनिट वाफ काढणे. वाढताना वरून तळलेले मटार व बटाटे घालुन खायला देणे.
टीप मला भात पांढरा ठेवून त्याला केशराचा वास द्यायचा होता म्हणून मी भात शिजवताना केशन न घालता शेवटी घातले. आधी सांगितल्याप्रमाणे मला मिरे फार आवडत असल्यानी मी खूप घातले आणि लवंग आणि वेलची जास्त वापरले नाही कारण मला ते फार जास्त आवडत नाहीत :) मुळ हे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्यांचा प्रमाण बदलू शकतात.वर दिलेल प्रमाण माझ्या चवीसाठी एकदम बरोबर होते आणि आता मी हा पुलाव दुपारच्या जेवणात खातीये. यमी!
0 comments:
Post a Comment