खजूर अक्रोड चॉकलेट ब्रावनी
थोड्या आठवड्यापूर्वी मी कॉस्टकोमधून अक्रोड आणि चॉकलेट चीप आणलेले. आज जेंव्हा मागच्या आठवड्याचे पायेश संपत आल्यावर मी हि ब्रावनी बनवण्याचे ठरवले. आठवड्यासाठी म्हणून केलेले हे ब्रावनी इतके छान झाले की ते सोमवारपर्यंतसुधा पुरतात की नाही अशी आशंका आहे.
साहित्य
८०ग्राम डार्क चॉकलेट बार
१.५ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप
३ वाटी पिठी साखर
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी खजूर
१ वाटी अक्रोड
३ अंडी
१ चमचा व्हॅनिला ईसेन्स
मीठ चवीपुरते
कृती
- एका काचेच्या भांड्यात डार्क चॉकलेट, १/२ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करून चांगले एकत्र करणे.
- अजून २० सेकंद मायक्रोवेव्ह करून ढवळणे.
- मैदा दोनदा चाळून घेणे.
- ओव्हन ३७५F/१९०C वर गरम करणे.
- एका मोठ्या भांड्यात अंडी, पिठी साखर, व्हॅनिला ईसेन्स घालुन ५ मिनिट फेटून घेणे.
- त्यात आधी बनवलेली चॉकलेट पेस्ट, चाळलेला मैदा आणि मीठ घालुन हलक्या हातानी एकजीव होईपर्यंत एकत्र करणे.
- केकच्या मिश्रणात उरलेले १ वाटी चॉकलेट चीप, खजूर आणि अक्रोड कापून घालणे व एकत्र करणे.
- केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे व ३७५F/१९०C वर ३५ मिनिट भाजणे.
- ब्रावनीवर आईस्क्रीम, चॉकलेट सॉस व अक्रोड घालुन खायला देणे.
टीप
मी चॉकलेट वितळवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करते आणि त्यामुळे किचकट काम एकदम सोपे होऊन जाते पण मायक्रोवेव्ह नसल्यास एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चॉकलेटचे भांडे ठेवून पण चॉकलेट वितळवता येईल.
0 comments:
Post a Comment