मनगणे
लहानपणी मला हा पदार्थ खूप आवडायचा, इतका की आई दर शनिवारी दुपारच्या जेवणात बनवायची आणि मी त्याची वाट बघायचे. आईची हि पाककृती मी थोडीशी बदलून वापरली आहे.
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
३/४ वाटी गुळ
१/२ वाटी काजू
१/२ वाटी मनुका
३ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
मीठ
कृती
- हरबरा डाळ १.५ वाटी पाणी घालुन ४-५ शिट्ट्या येईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घेणे.
- त्यात गुळ, काजू, मनुका, वेलची पूड आणि मीठ घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट उकळवणे व नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणे.
- त्यात दुध घालुन वाढणे.
टीप
सगळ्यात सोप्पी डीश आहे नाही :) चव गुळ, डाळ आणि सुक्यामेव्यानी येते.
नेहमीच्या दुधाऎवजी नारळाचे दुध वापरता येईल पण आई दुध वापरते म्हणून मी पण तेच वापरले.
Hey, thanks for recipe. I did Mangana as m home alone i was looking for easy recipe. I was aware of the contains in it but not confidant about quantity. Just googled for mangana n found ur page. Will save it to my blog page so next time i can try some other dishes.
btw chav chhan aliye :-D
thanks again.
Saurabh, Glad you found this useful and it turned out great. Thanks. Do let me know if you try anything else from the blog.