खतखते
मला एकदम लहान असल्यापासून हा पदार्थ खूप आवडतो. बेळगावला काकीकडे गेल्यावर तिथे खायचो. आतापर्यंत मला लक्षात नव्हता आला की हा एकदम तब्येतीसाठी उत्कृष्ठ पदार्थ आहे :) नावाप्रमाणेच फ्रीजमधले सगळे संपवण्यासाठी एकदम उत्तम
साहित्य
१ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
२ शेवग्याच्या शेंगा
२ कणीस
१ बटाटा
१ रताळे
१ कच्चे केळे
१.५ चमचा चिंच
१/४ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
१/४ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर हिंग
२ चमचा तूप
मीठ
कृती
- अर्धा वाटी पाण्यात चिंच भिजवणे.
- मोठ्या भांड्यात घेवडा आणि ४ वाटी पाणी घालुन मोठ्या आचेवर ५ मिनिट शिजवणे.
- कणीस ३ तुकडे करून त्यात घालणे. २ वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट शिजवणे.
- त्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळे, कच्चे केळे आणि २ वाटी पाणी घालुन अर्धवट शिजवणे.
- त्यात खोबरे, चिंच आणि घने अर्धा वाटी पाणी घालुन वाटून घालणे.
- भाज्या शिजत आल्याकी त्यात मटार घालणे.
- हळद, गुळ, तिखट आणि मीठ घालुन उकळवणे.
- छोट्या कढईत तूप आणि म्हवरी घालुन फोडणी करणे व हिंग घालणे. फोडणी भाजीत घालणे.
टीप
ह्यात १ वाटी भोपळ्याचे तुकडे पण घालता येतील पण इथे मला न मिळाल्यानी वापरले नाहीये.
0 comments:
Post a Comment