मटारची भाजी आणि सामोसा


आई बऱ्याच वेळा सामोसा बनवायची. तो माझा सगळ्यात आवडीच्या पदार्थांपैकी एक होता, असेल आणि आहे :) प्रत्येक वेळा ते बनवताना माझी मदत आणि अर्थातच कमिशनपण वाढत गेल :D आता मां बाबा इथे आल्यावर मी सामोसा बनवून त्यांना इम्प्रेस करायचा ठरवलं :) [सामोसा बनवणे हे पहिल्यांदा खूप किचकट आणि कष्टच काम वाटत पण २-३ वेळा केल्यावर पाहुण्यांना देण्यासाठी एकदम सोपा आणि रुचकर पदार्थ आहे]

मटारची भाजी

मटारची भाजी
साहित्य
३ वाटी मटार
१ बटाटा
१ चमचा मौव्हरी
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आलं पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करून त्यात माव्हारीची फोडणी करणे
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट आणि हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) घालणे
  • कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात जीरा पूड आणि धने पूड घालणे.
  • त्यात बटाट्याचे तुकडे, मटार आणि पाणी घालुन बटाटे पूर्णपणे शिजवणे.
  • चवीपुरते मीठ घालुन भाजी सुकवणे.

टीप
भाजी फक्त भाजीम्हणून वापरायची असेल तर थोडी पातळ ठेवायला हरकत नाही पण सामोस्यासाठी वापरायची असेल तर सुकीच पाहिजे
भाजीमध्ये थोडा शेंगदाण्याचा कुट पण घालता येईल

सामोसा

सामोसा
साहित्य
५ चमचा भरून मैदा
२ वाटी मटारची भाजी
तेल

कृती

  • ४ चमचे मैदा थोडा तेल आणि थंड पाणी वापरून भिजवणे
  • बाकीचा मैदा थोड्या पाण्यात भिजवून पेस्ट बनवणे.
  • भिजलेल्या पीठाचे छोटे गोळे घेऊन पातळ लाटणे
  • लाटलेली चपाती तेल न लावता तव्यावर मंद आचेवर अर्धवट भाजणे
  • आता त्या चपातीला अर्धे करणे
  • प्रत्येक अर्धी चपाती घेऊन त्याचा कोन करणे
  • मैद्याची पेस्ट लाऊन कोन नीट चिकटवणे
  • त्यात थोडी मटारची भाजी भरून कडा नीट बंद करणे.
  • तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे

टीप
चपाती दुमडून कोन बनवताना, तो असा बनला पाहिजे की तो दाबला तर तो त्या चपातीचा १/३ अंश असला पाहिजे
तसेच सोमासा भजी भरून बंद करताना असा बंद करायचा की दुमडलेल्या कडा उजवी आणि डावीकडे असतील

कॉर्न पॅटिस


हि माझ्या आईची पाककृती.. एकदम छान होते आणि करायलापण एकदम सोपी. आई कशी करायची ते मला आता आठवत नाही. तिला ते बनवताना बघून बरेच दिवस झाले, त्यामुळे आता फक्त वर वरूनच लक्षात आहे ती जे काही करायची. त्यामुळे आई करते तशी नसली तरी आज एकदम मस्त झाल्यामुळे मी इथे पोस्ट करतीये.

कॉर्न पॅटिस
साहित्य
२ बटाटे
१ वाटी कॉर्न
१ चमचा जीरा पूड
१ चमचा तिखट
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा लसूण पेस्ट
१-२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
रवा
तेल

कृती
  • बटाटे व कॉर्न कुकरमध्ये उकडून घ्यावेत.
  • बटाटे कुस्करून त्यामध्ये तिखट, जीरा पूड, धने पूड, लसूण पेस्ट आणि मीठ घालुन चांगले मळावे.
  • त्यामाच्ये उकडलेले कॉर्न घालुन अलगद एकत्र करणे
  • कॉर्न फ्लौर घालुन मिश्रण चांगले घट्ट करावे.
  • लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून त्यांना चपटे करावे.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालावे
  • बनवलेले पॅटिस रव्यामध्ये घोळवून तव्यावर टाकावेत.
  • दोन्हीबाजूनी गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजावेत

टीप
कॉर्न फ्लौरमुळे पॅटिसाचे मिश्रण दाट होते, तसे नसल्यास ते भाजताना तेलात विरघळू शकतात. साधारण १-२ चमचे कॉर्न फ्लौर पुरे पडते पण जर मिश्रण तरीसुद्धा पातळ वाटल तर अजून थोडा कॉर्न फ्लौर घालण्यासाठी संकोच करू नये
कॉर्नच्या ऎवजी मटार घालुन मटार पॅटिस पण असेच बनवता येतील

कॉर्न आणि कैरी चाट


ही पाककृती मी स्वतः बनवली आहे. :) कैरीला तिखट मीठ लावून हा माझा आवडता पदार्थ. तसाच कॉर्नवरती तिखट, मीठ आणि लिंबू हा पण. त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांची प्रेरणा घेऊन मी ही पाककृती बनवली. चविष्ठ.

कॉर्न आणि कैरी चाट
साहित्य
३-४ वाटी ताजे किंव्हा फ्रोझन कॉर्न
१ कैरी
१ चमचा लोणी
तिखट चवीनुसार
मीठ
२ चमचे कोथिंबीरीची पानं (इच्छेनुसार)

कृती
  • कॉर्न कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  • कैरी किसावी
  • कढईत लोणी विरघळावे
  • त्यात उकडलेले कॉर्न, कैरी, तिखट, मीठ घालुन हलक्या हातानी ढवळणे
  • थोडे कोमट होईपर्यंत आचेवर ठेवावे.
  • कोथिंबीरीची पानं घालुन सजवणे

टीप
हा पदार्थ थोडा मसालेदारच छान लागतो त्यामुळे कंजूसी न करता तिखट घालणे. :)

पुदिन्याचा पराठा


मागच्या रविवारी मी जेंव्हा कटलेट बनवला तेंव्हा पूदिना चटणी बनवण्याचा बेत बनवला. मी तेंव्हा अजॉयला थोडासा पुदीना आनण्यास सांगीतल. पण त्यानी मोठी गड्डी आणली. मग काय इथे पुदिना फेस्टिवलच चालू झाला. त्यातूनच ह्या पदार्थाचा जन्म झालं.

पूदिना पराठा
साहित्य
४ चमचे पुदिना
१ चमचा कोथिंबीरीची पान
५ चमचे भरून गव्हाचे पीठ
१.५ चमचे बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा जीरा पुड
१/४ चमचा धने पुड
मीठ
तेल/तुप

कृती
  • तेल सोडून सगळे साहित्य एकत्र करने
  • त्यात २ चमचे तेल घालणे
  • पाणी घालून पीठ नीट मळून घेणे
  • ३० मिनिटे पीठ भिजायला बाजुला ठेवणे
  • ३ घड्य घालून पराठे बनवाने
  • तव्यावर भाजून लोणी, लोणचे आणि दह्याबरोबर वाढणे
टीप
कोथिंबीरीच्या पानांमुळे एक मस्त चव येते पण जर तुम्हाला पुन्दिना खुप आवडत असेल तर कोथिंबीरीची पान वगळली तरी चालतील
मी पराठे भाजताना तेल वापरते आणि अर्धे भाजून झाल्यावर त्याना थोडेसे तूप लावून भाजते. त्यामुळे तेल पराठ्यांमद्धे चांगले मुरते

डिमेर ढोका


ही बंगाली पाककृती मी इंटरनेटवर सर्फ करत असताना बघितली आणि माझ्या चवीनुसार थोडीफार बदलली. बंगालीमध्ये डीम म्हणजे अंड आणि ढोका म्हणजे ढोकळा. ही अंड्याच्या ढोकळ्याची ग्रेव्ही. पण असे असताना सुद्धा नुसता अंड्याचा ढोकळा पण खूप चविष्ट लागतो आणि नाश्त्याला छान लागतो.

ढोका

डिमेर ढोका
साहित्य
६ अंडी
१ छोटा कांदा
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ मिरच्या बारीक चिरून
१ चमचा आलं पेस्ट
३ चमचे दुध
चिमुटभर बेकिंग पावडर
मीठ

कृती
  • एका भांड्यात अंड फेसून घ्या
  • त्यात बारीक चिरून कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं पेस्ट, बेकिंग पावडर, दुध आणि मीठ घालुन ढवळणे.
  • तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण घालुन कुकर मध्ये शिट्टी न लावता उकडणे
  • पूर्णपणे ढोकळा शिजल्यानंतर कुकरमधून काढून लाडेच ताटात काढणे.
  • चौकोनी तुकडे करून वाढणे किंवा ग्रेव्हीसाठी बाजूला ठेवणे


ग्रेव्ही

डीमेर ढोका ग्रेव्हीमध्ये
साहित्य
२-३ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टोमेटो
१ चमचा मौव्हरी आणि जीरा
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी दही (इच्छेनुसार)
२ चमचा जीरा पूड
२ चमचा धने पूड
२ वाटी पाणी
१ चमचे साखर
१ चमचा तिखट
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती

  • कांदा आणि टोमेटो वेगळे वेगळे मिक्सरमध्ये वाटून घेणे
  • कढईमध्ये तेल गरम करून मौव्हरी आणि जीरा घालणे
  • फोडणीझाल्यावर त्यात वाटलेला कांदा आणि साखर घालुन सारखे हलवत तेल वेगळे होईपर्यंत शिजवणे.
  • त्यामध्ये वाटलेला टोमेटो, आलं आणि लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालणे. टोमेटो शिजेपर्यंत ढवळत शिजवावे
  • तोपर्यंत एका वाटीमध्ये दही, जीरा पूड, धने पूड आणि तिखट एकत्र करणे
  • टोमेटो शिजल्यावर कधी आचेवरून बाजूला काढून त्यात दह्याचे मिश्रण घालणे.
  • व्यवस्तीथ हलवून पुन्हा मंद आचेवर ठेवणे.
  • ग्रेव्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत सारखे हलवत, जरूर पडल्यास पाणी घालुन शिजवणे.
  • डीमेर ढोका आणि मीठ घालुन एक उकळी काढणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे.

टीप
अंड्याच्या ढोकळ्यामध्ये टोमेटो बारीक चिरून घालता येईल पण मला अंड्याबरोबर टोमेटो बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नाही घातला.
६ अंड्यापासून अंदाजे २० ढोकळे तयार होतात
पहिल्यांदा जेंव्हा मी ही ग्रेव्ही केली होती तेंव्हा मी दही घालुन केलेली पण काल मी दही न घालता केली आणि मला ती जास्त छान लागली.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP