Jun 2010
24
अननस फ्राईड भात
आज काल बाहेर खायचा म्हटलं म्हणजे त्यात थाई पदार्थ माझे फार आवडीचे. फ्राईड भात तर पाहिजेच पण जर त्यात अननस वाला भात मिळाला तर सोने पे सुहागा :) पण बरेच दिवस झाले मी थाई पदार्थ घरी बनवून त्यामुळे आज मी नेहमीच्या भाताऎवजी अननस फ्राईड भात बनवण्याचा ठरवलं
साहित्य
३ वाटी तांदूळ
३ वाटी ब्रोकोली
२ वाटी अननस
१ वाटी गाजर
१ वाटी सेलरी
१ वाटी लाल ढोबळी मिरची
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
१/४ वाटी सोया सॉस
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवणे
- दुसऱ्या भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ घालणे. भात शिजत आलं की त्यातील पाणी गाळून भात बाजूला ठेवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदे, हिरव्या मिरच्या, गाजर, सेलरी, ब्रोकोली, ढोबळी मिरची घालुन परतवणे.
- भांज्याचा कच्चा वास निघून गेला आणि अर्धवट शिजल्यावर त्यात अननस, सोया सॉस आणि मीठ घालुन अजून परतवणे.
- त्यात भात घालुन २-३ मिनिट परतवणे.
टीप
सोया सॉस थोडा खारट असतो त्यामुळे मीठ एकदम बेतानीच घालणे.
0 comments:
Post a Comment