हरियाली मेन्गो पनीर
आज आम्ही कपिल आणि श्रीन्खलाला रात्रीच्या जेवणासाठी भेटणार होतो. पण आयत्यावेळी आम्ही तो बेत रद्दकरून घरीच काहीतरी खाण्याचे ठरवले. माझ्याकडे मागच्या आठवड्यात मयुरीमधून आणलेली कैरी होती त्यामुळे मी त्याचे सलाड बनवण्याचा विचार करत होते पण शेवटच्याक्षणी मी बेत बदलून हरियाली मेन्गो पनीर बनवले. अतिशय उत्तम चव आली.
साहित्य
३ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी पुदिना
१ कैरी
१ कांदा
२ वाटी पनीर
१ हिरवी मिरची
१ चमचा लसूण पाकळ्या
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
मीठ चवीपुरतं
तेल
कृती
- मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि १ वाटी पाणी घालुन बारीक पेस्ट बनवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे.
- त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
- त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरचीची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे.
- त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालुन ढवळणे.
- पनीरचे तुकडे आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे
टीप
मी जी कैरी वापरली ती फार आंबट नव्हती त्यामुळे त्याच्या हलक्या आंबटपणामध्ये भाजीची चव एकदम खुलून आली. त्यामुळे जर कैरी खूप आंबट असेल तर त्याचे प्रमाण कमी करायला विसरू नये.