हिरवे सॅलेड
इथे आल्यापासून वेग वेगळे समान खूप पटकन मिळते म्हणून मी थोडा वेगळा प्रयोग करायचा ठरवला. इथे माझा पहिला सॅलेड बनवायचा प्रयोग देत आहे.
साहित्य
१० हिरव्या लेट्युसची पाने
१/२ वाटी ग्रेप टोमाटो
१/२ अननस
१/४ वाटी कॉर्न
१० पिकल्ड काकडी
५ पिकल्ड मिरची
१/२ चमचा ओरिगानो
२.५ चमचा रांच ड्रेसिंग
मीठ
कृती
- कॉर्न उकळत्या पाण्यात किंवा मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिट शिजवून घेणे. त्यातील पाणी ओतून बाजूला ठेवणे.
- लेट्युस बारीक चिरणे.
- ग्रेप टोमाटो अर्धे चिरून लेयुसमध्ये घालणे.
- त्यात अननस बारीक चिरून, पिकल्ड काकडीचे तुकडे अर्धे करून घालणे.
- त्यात बारीक चिरलेली पिकल्ड मिरची आणि कॉर्न घालुन एकत्र करणे.
- त्यात रांच ड्रेसिंग, ओरिगानो आणि मीठ घालुन एकत्र करणे.
टीप
एकदम सोप्पा, पौष्टिक आणि चविष्ठ पदार्थ आहे. रांच ड्रेसिंग आणि ओरिगानो एकदम चांगला लागत होता. अजून वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि ड्रेसिंग वापरायचा बेत आहे.
0 comments:
Post a Comment