कोथिंबीर चिकन
शुक्रवारी अजॉयनी मला चिकन रोल बनवायला सांगितले तेंव्हा त्यात घालायला म्हणून मी हि भाजी बनवलेली. मला नेहमीची लाल मसाला करायचा कंटाळा आलेला. त्यानी चिकन खाऊन सांगितला की हे आता पर्यंतच सगळ्यात चांगला चिकन होता. मला वाटला की खूप दिवसांनी चिकन बनवलंय म्हणून तो असा म्हणतोय. पण रविवारी जेव्हा मित्रमैत्रिणीना बोलावण्याचे ठरवले तेंव्हा तो म्हणाला की हि डीश पुन्हा करायलाच हवी. जेव्हा थोडासा खाल्यावर पुन्हा त्यानी तशीच प्रतिक्रिया दिली मी लगेच फोटो काढून ठेवले. मित्रमैत्रिणीनी पण डीशची खूप तारीफ केली तेंव्हा मला पोस्ट करावाच लागलं :)
साहित्य
१/२किलोग्राम बोनलेस चिकन
१ चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा मिरे पूड
३-४ लसूण पाकळ्या
१ चमचा आले पेस्ट
१ मोठा टोमाटो
२ वाटी कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- चिकनला मीठ, जीरा पूड, धने पूड, गरम मसाला, मिरे पूड लावून अर्धा तास ठेवून देणे.
- कढईत तेल गरम करून त्यात चिकन गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घेणे.
- तोपर्यंत टोमाटो, लसूण आणि आले मिक्सरमध्ये वाटून घेणे.
- त्यात कोथिंबीर घालुन पुन्हा बारीक वाटणे.
- चिकन मध्ये टोमाटो-कोथिंबीर मिश्रण, मीठ घालुन सुके पर्यंत शिजवणे.
टीप
चिकन रोल बनवण्यासाठी कांदा आणि हि भाजी घालता येईल. खूप सुंदर लागते. असेच भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाता येईल. कसेही खा चाविष्ठच लागते.
0 comments:
Post a Comment