चॉकलेट गनाश
मी हे गनाश ह्या एकदम चविष्ठ अंड्याविना चॉकलेट केकसाठी बनवले. बनवण्यासाठी एकदम सोप्पे आणि एकदम सुंदर आणि बाहेर हॉटेलमध्ये मिळते तसे हे आईसिंग माझे आवडते आहे.
साहित्य
२ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी क्रीम
१ चमचा लोणी
कृती
- एका भांड्यात १ चॉकोचिप्स आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
- त्यात अर्धा वाटी क्रीम आणि उरलेले १ वाटी चॉकोचिप्सघालुन फेटणे.
- मिश्रण अजून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
- त्यात उरलेले अर्धा वाटी क्रीम घालुन मिश्रण एकजीव होऊन चमकेपर्यंत ढवळत राहणे.
टीप
मायक्रोवेव्हच्याऎवजी डबलबॉईलर (उकळत्या पाण्याच्या भांड्यावर दुसरे भांडे ठेवून) वापरून पण चॉकलेट वितळवता येईल पण मायक्रोवेव्हमुळे एकदम सोप्पे आणि स्वत्च्छ काम होते.