तंदुरी चिकन
सगळ्यात आवडता स्टारटर. हैद्राबादमध्ये असताना मी एव्हरेस्टचा मसाला वापरून बनवायचे पण आज इथे वेगवेगळे मसाले एकत्र करून बनवले
साहित्य
६ कोंबडीचे पाय
३/४ वाटी दही
२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
२ चमचा आले पेस्ट
२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचे लिंबू
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचा तेल
१/२ चमचा लोणी
मीठ
कृती
- कोंबडीच्या पायांवर धार धार चाकुनी चिरा मारणे.
- त्याला २ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तिखट लावून ३० मिनिट बाजूला ठेवणे.
- एका भांड्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा तिखट, २ चमचा लिंबाचा रस, गरम मसाला, तेल आणि मीठ एकत्र करणे.
- हे मिश्रण कोंबडीला लावून फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवणे.
- ओव्हन ३९५F/२००C वर गरम करणे.
- लोणी वितळवून चिकनवर सोडणे व ओव्हनमध्ये १५ मिनिट भाजणे
- तुकडे परतवणे व लोणी सोडणे. अजून १५ मिनिट भाजणे.
- पुन्हा परतवून लोणी सोडणे व १० मिनिट भाजणे.
- चाट मसाला पसरवून, कांदा आणि लिंबाच्या तुकड्याबरोबर खायला देणे.
टीप
लेगच्याऎवजी ७०० ग्राम कुठलेही तुकडे वापरता येतील
हॉटेलमध्ये लाल रंग येण्यासाठी रंगाचा वापर करतात माझ्याकडे तो नसल्यानी आणि वापरायची इच्छा नसल्यानी मी वापरला नाहीये.
मी भाजण्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला. त्यामुळे जास्तीचे तेल/लोणी खाली तव्यावर साठते.
0 comments:
Post a Comment