वांग्याचा पराठा
हल्ली मी खूप पराठे बनवते. बनवायला एकदम सोप्पा आणि भाज्या वगैरे बनवत बसायला नाही लागत. हा पराठा असाच काहीतरी प्रयोग करत बनवला. २-३ वेळा आधी बनवलेला पण कालचा एकदम छान होता त्यामुळे इथे देत आहे.
साहित्य
१ मध्यम आकारच वांग
२ वाटी गव्हाचे पीठ
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
२-३ कोथिंबीर पाने
मीठ
तेल
कृती
- वांगे ओव्हन मध्ये ५००F वर २५ मिनिट ब्रोईल करणे व मग थंड करणे.
- वांग्याचे साल काढून आतील गराला चांगले एकत्र करणे.
- त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालणे.
- गव्हाचे पीठ घालुन पीठ चांगले घट्ट भिजवणे व तेलाचा हात लावून २०-३० मिनिट भिजण्यासाठी ठेवून देणे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून, ३ घड्या घालुन पराठे बनवणे.
- तव्यावर तेल सोडून भाजणे व थंड दही आणि लोणच्याबरोबर वाढणे.
टीप
वांगे भरते बनवताना भाजतात तसे गॅसवर भाजत येईल. ओव्हनमध्ये भाजण्यासाठी इथल्या ओव्हन मधली ब्रोईल बेकिंग पेक्षा चांगले होते त्यामुळे त्यातला रस बाहेर नाही येत आणि त्यामुळे कमी गव्हाचे पीठ वापरून पराठे बनवता येतात आणि वांग्याची चव शिल्लक राहते.
0 comments:
Post a Comment