तवा पनीर
सारख्या एक प्रकारच्या भाज्या खाऊन मला फार कंटाळा आलेला. पालक नसल्यानी मला पालक पनीर बनवता नाही आहे. सायकलिंग करून दामल्यांनी आणि दिल मिल गये आणि त्यातले अभी निकी सिन्स बघण्यात मी गुंग असल्यानी स्वताचीच हि तवा पनीरची डीश तयार केली.
साहित्य
२०० ग्राम पनीर
१ कांदा
२ टोमाटो
४-५ ढोबळी मिरची
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल
कृती
- पनीर, टोमाटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे
- तवा गरम करून त्यात तेल घालुन पनीरचे तुकडे भाजून घेणे.
- त्याच तेलात कांदा, गुलाबी रंगावर भाजून घेणे.
- त्याच तेलात ढोबळी मिरची भाजून बाजूला ठेवणे.
- आता त्याच तेलात टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे.
- त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड आणि आमचूर पूड घालुन २-३ मिनिट परतत शिजवणे.
- त्यात पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि मीठ घालुन चांगले एकत्र करणे व ४-५ मिनिट शिजवून गरम गरम वाढणे.
टीप
मला ह्यात जास्त पदार्थ घालायचे नव्हते तसेच जास्त मसालेदार पण बनवायचे नव्हते. ह्यात पनीर आणि मसाल्याचे एकदम छान संगत देऊन चांगले लागले.
मी नॉनस्टिक तवा जो थोडा खोलगट होता तो वापरला त्यामुळे सगळे पदार्थ ढवळताना बरे पडले.