खोबऱ्याची लस्सी
मी जेंव्हा हि कृती वाचलेली तेंव्हा मला बिलकुल वाटले नव्हते की ती इतकी सुंदर होईल.
साहित्य
१/२ खोबरे
१ वाटी चक्का
८ चमचे साखर
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ
कृती
- खोबरे किसून त्यात पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटून खोबऱ्याचे दुध काढणे.
- चक्का, केशर, वेलची पूड, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये एकत्र वाटणे.
- त्यात खोबऱ्याचे दुध घालुन पुन्हा वाटणे
- मिश्रणात बर्फ घालुन पुन्हा थोडे वाटणे
- प्यायला देताना त्यात केशर घालुन देणे.
टीप
चक्का दुकानातून खरेदी करता येईल किंवा घरी बनवता येईल. मी जेंव्हा श्रीखंड बनवले तेंव्हा त्यातील एक वाटी चक्क बाजूला ठेवून हि लस्सी बनवली. चक्का बनवण्याची कृती श्रीखंड व आम्रखंड ह्या दोन्हींच्या कृतीत दिलेली आहे.
मी नेहमी घरी बनवलेले नारळाचे दुध वापरते जे एकदम जाड नसते त्यामुळे मी बर्फ न वापरता लस्सी बनवून मग थंड केली. जर विकतचे खोबऱ्याचे दुध वापरायचे असेल तर त्यात बर्फ किंवा पाणी वापरणे महत्वाचे आहे. १ वाटी चक्क्यात १ वाटी पाणी किंवा बर्फ आणि ३ वाटी नारळाचे दुध बरोबर होईल