लेमन शिफॉन केक
मला आता आठवत पण नाही कि मी हा केक कधी आणि कसा बनवण्याचे थरवले. बहुदा मी जेंव्हा हलका आणि मऊसर केक करण्याचा प्रयोग करताना हा केक बनवला असेल. पण त्यानंतर मी बर्याच वेळा हा केक बनवला आणि प्रत्येक वेळा एकदम हिट होता :) आठवड्यापूर्वी कॉस्कोमधून लेमन क्रीम आणि व्हाईट चॉकलेट वाले बदाम आणले आणि मला ह्या केकची आठवण झाली
साहित्य
१.५ वाटी - १.५ टेबल स्पून मैदा
१.५ टेबल स्पून कॉर्न फ्लौर
१/४ टी स्पून बेकिंग सोडा
१/४ टी स्पून मीठ
१.५ वाटी + १ टेबल स्पून साखर
२ लिंबू
३ अंडी
१/२ वाटी तेल
१/२ टी स्पून व्हॅनिला इसेन्स
१/४ टी स्पून क्रीम ऑफ टारटर
कृती
- ओव्हन ३२५F/१६५C वर गरम करणे
- मैदा, कॉर्न फ्लौर, बेकिंग सोडा, मीठ आणि १.५ वाटी साखर एकत्र करणे
- अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगळे करणे
- अंड्याचे पांढरे फोमी होईपर्यंत फेटणे
- त्यात क्रीम ऑफ टारटर घालून सॉफ्ट पिकस येईपर्यंत फेटणे
- त्यात उरलेली १ टेबल स्पून साखर घालून हार्ड पिक्स येईपर्यंत फेटणे व मिश्रण बाजूला ठेवणे
- एका भांड्यात अंड्याचे पिवळे, लिंबाचे साल किसून, १ टेबल स्पून लिंबाचा रस, तेल,व्हॅनिला इसेन्स आणि २/३ वाटी पाणी घालून फेटणे
- त्यात मैदयाचे मिश्रण घालून फेटणे
- १/३ अंड्याचे पांढरे मिश्रण एका वेळी घालून हलक्या हातानी ढवळणे, असे सगळे मिश्रण एकत्र होईपर्यंत करणे
- ८. ५ इंचाचे लोफच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण घालणे
- ३२५F/१६५C वर ४५ मिनिट केक भजने व नंतर बाहेर काढून थंड होऊ देणे
टीप
मैदा आणि कॉर्न स्टार्च मोजताना पहिल्यांदा १.५ टी स्पून कॉर्न फ्लौर वाटीत घालणे व त्यात नंतर मैदा घालून मोजणे. केक फ्लौर पण ह्याऐवजी वापरता येईल.