कॉर्न कोथिंबीर पराठा
सर्व वाचकांना नवीन वर्ष्याच्या शुभेच्या. सुट्टीनंतरचे हे माझे पहिले पोस्ट. तसे ते पराठे मी अजॉय भारतातून आलेल्या दिवशीच बनवलेले पण कामामध्ये व्यस्त असल्यानी आज मला पोस्ट करण्यासाठी वेळ मिळालाय. हे पराठे बनवणा एकदम सोपं असून त्यात फ्रीजमध्ये सहज सापडणारे पदार्थ वापरलेत आणि तरीसुधा ते फारच चविष्ट झालेले.
साहित्य
२ वाटी कॉर्न
२ वाटी गव्हाचे पीठ
मुठभर कोथिंबीर पाने
५ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१/२ लिंबू
चाट मसाला
मीठ
तूप
तेल
कृती
- गव्हाच्या पिठात एक चमचा तेल आणि नंतर पाणी घालुन मळावे व बाजूला ठेवून देणे.
- मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिट कॉर्न शिजवून घेणे.
- मिक्सरमध्ये लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कॉर्न, लिंबाचा रस आणि मीठ घालुन पेस्ट बनवणे
- पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून ते लाटावेत.
- एका लाटलेल्या चपातीवर कॉर्न-कोथिंबीर ह्याची वाटलेली पेस्ट पसरवणे. दुसरी चपाती त्यावर ठेवून त्याच्या कडा बंद करणे.
- गरम तव्यावर तेल व तूप लावून दोन्ही बाजे मध्यम आचेवर भाजणे.
- चिमुटभर चाटमसाला शिंपडून लोणचे व दह्याबरोबर खायला देणे.
टीप
मी कॉर्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग केला कारण ते खूप पटकन आणि सहज होऊन जाते पण जर मायक्रोवेव्ह नसेल तर कॉर्नमध्ये पाणी घालुन उकळवणे आणि नंतर जास्तीचे पाणी ओतून देणे.