खजूर चॉकोचीप पॅन केक
मी बरेचवेळा पॅन केक बनवले आहेत कारण ते एकदम सोपा आणि चविष्ठ नाश्ता होतात. मी क्रॅनबेरी, आंबा,ब्लूबेरी असे वेग वेगळी फळे घालुन बनवलंय पण आज फळे नसल्यानी मी त्यात खजूर आणि चॉकोचीप घालुन बनवला. केक एकदम सुंदर झाला आणि नाश्ता एकदम मस्त होता.
साहित्य
१/२ कप खजूर
१/४ वाटी चॉकोचीप
१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप मैदा
३/४ वाटी दही
१ अंड
३/४ चमचा साखर
१/२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/२ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
२.५ चमचा वितळवळेल लोणी
मीठ
तेल
कृती
- खजुरातून बिया काढून बारीक चिरावे.
- मैदा आणि पीठ एकत्र चाळून घेणे.
- त्यात साखर, मीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पूड घालुन एकत्र करणे.
- त्यात अंडे, दही, वितळवलेले लोणी आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन एकत्र करणे.
- त्यात १/२ वाटी कोमट पाणी घालुन फेटणे.
- नॉनस्टिक तवा गरम करणे.
- त्यावर एकावेळी अर्धा कप पीठ ओतणे व त्यावर चॉकोचीप आणि खजूर पसरवणे.
- मध्यम आचेवर गुलाबी रंगावर दोन्ही बाजू परतून घेणे. देताना मध किव्हा मॅपल सिरप वरून ओतून खायला देणे.
टीप
पिठातच लोणी असल्यानी तव्याला तेल लावावं लागत नाही.
अजॉयला खजुराचा गोडपणा जरा जास्त वाटला त्यामुळे मला वाटतंय की डार्क चॉकोचीप वापरले तर गोड बरोबर होईल.