काकडीचे ऑमलेट
बरेच दिवसांनी मी इथे पोस्ट करत आहे. मागच्या आठवड्यात बनवलेले पदार्थ मला फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद नसल्यानी राहून गेले पण आज उठायला उशीर झाल्यानी काहीतरी पटकन बनणारे बनवण्यासाठी म्हणून हा प्रयोग केलाय
साहित्य
१ काकडी
१ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल
कृती
- काकडी किसून घेणे.
- त्यात तांदुळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- पाणी घालुन पातळ पीठ बनवणे.
- तवा गरम करून त्यावर तेल लावणे. पीठ ओतून मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी शिजेपर्यंत शिजवणे.
टीप
ह्यासाठी नॉनस्टिक तवा वापरल्यानी तव्याला चिकटत नाही
मी कधी कधी ह्यात एक-दोन चमचा रवा घालते त्यामुळे थोडे कमी चिकट होते.
हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर जास्त चांगले लागते पण वेळ नसल्यानी मी लोणच्याबरोबर खायला दिले