कॉर्न कोथिंबीर पराठा


सर्व वाचकांना नवीन वर्ष्याच्या शुभेच्या. सुट्टीनंतरचे हे माझे पहिले पोस्ट. तसे ते पराठे मी अजॉय भारतातून आलेल्या दिवशीच बनवलेले पण कामामध्ये व्यस्त असल्यानी आज मला पोस्ट करण्यासाठी वेळ मिळालाय. हे पराठे बनवणा एकदम सोपं असून त्यात फ्रीजमध्ये सहज सापडणारे पदार्थ वापरलेत आणि तरीसुधा ते फारच चविष्ट झालेले.


कॉर्न कोथिंबीर पराठा
साहित्य
२ वाटी कॉर्न
२ वाटी गव्हाचे पीठ
मुठभर कोथिंबीर पाने
५ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१/२ लिंबू
चाट मसाला
मीठ
तूप
तेल

कृती
  • गव्हाच्या पिठात एक चमचा तेल आणि नंतर पाणी घालुन मळावे व बाजूला ठेवून देणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिट कॉर्न शिजवून घेणे.
  • मिक्सरमध्ये लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कॉर्न, लिंबाचा रस आणि मीठ घालुन पेस्ट बनवणे
  • पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून ते लाटावेत.
  • एका लाटलेल्या चपातीवर कॉर्न-कोथिंबीर ह्याची वाटलेली पेस्ट पसरवणे. दुसरी चपाती त्यावर ठेवून त्याच्या कडा बंद करणे.
  • गरम तव्यावर तेल व तूप लावून दोन्ही बाजे मध्यम आचेवर भाजणे.
  • चिमुटभर चाटमसाला शिंपडून लोणचे व दह्याबरोबर खायला देणे.

टीप
मी कॉर्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग केला कारण ते खूप पटकन आणि सहज होऊन जाते पण जर मायक्रोवेव्ह नसेल तर कॉर्नमध्ये पाणी घालुन उकळवणे आणि नंतर जास्तीचे पाणी ओतून देणे.

स्ट्रॉबेरी क्रेप


मी हे क्रेप्स एकंदर एक महिन्यापूर्वी बनवलेले पण त्यांच्याविषयी पूर्णतः विसरून गेलेले. काल एकदम लक्षात आल्यावर मी त्याचे फोटो शोधायला चालू केले. आणि मग लक्षात आले की तेंव्हा माझा कॉम्प्युटर बिघडला असल्यानी ते मी अजॉयच्या कॉम्प्युटरवर ठेवले आणि विसरून गेले. आज हि सोपी, सहज अशी चविष्ठ पाककृती इथे देत आहे.

स्ट्रॉबेरी क्रेप
साहित्य
३ वाटी स्ट्रॉबेरी
१/२ वाटी मैदा
१.५ वाटी दुध
१/२ वाटी वितळवलेले लोणी
२ अंडी
१/२ व्हॅनिला ईसेन्स
२ चमचा साखर
मीठ चवीपुरते

कृती
  • एका भांड्यात स्ट्रॉबेरी बारीक चिरून त्यात एक चमचा साखर घालुन बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, दुध, उरलेली एक चमचा साखर, लोणी, व्हॅनिला ईसेन्स, अंडी आणि मीठ घालुन हॅन्ड मिक्सर वापरून फेसणे
  • तवा गरम करून त्यावर डावभर मिश्रण घालुन तवा तिरका करून पातळ पसरवणे
  • मध्यम आचेवर क्रेप दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे व एका ताटात काढणे
  • आता ह्या क्रेपवर २ चमचा स्ट्रॉबेरीचे सारण पसरवून रोल बनवणे. पाहिजे असल्यास थोडी पिठीसाखर शिंपडून खायला देणे.

टीप
मी क्रेप भाजण्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर केला त्यामुळे मला तेल बिलकुल वापरावे लागले नाही.

कलिंगड स्प्लॅश


आजच्या जेवणानंतर मला कलिंगडाच काहीतरी नवीन बनवण्याचं मन केल आणि त्यातूनच ही ज्यूसची पाककृती आली.

कलिंगड स्प्लॅश
साहित्य
१/२ कलिंगड
२ मोठे लिंबू
४ चमचे साखर
६-७ पुदिना पानं
१/४ चमचे चाट मसाला
१/४ चमचे जिरे पूड
चिमुटभर मिरे पूड
मीठ चवीनुसार

कृती
  • कलिंगड चिरून मिक्सरच्या भांड्यात घालणे
  • त्यात लिंबू रस, साखर, पुदिना पानं, मीठ, जीरा पूड, चाट मसाला घालणे
  • मिक्सरमध्ये ज्यूस चांगला वाटून घेणे
  • ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यावर मिरे पूड शिंपडणे. ज्यूस थंड होण्यासाठी ठेवून देणे.
  • वरून पुदिना पानं आणि कलिंगडाचे गोळे घालुन प्यायला देणे.

टीप
ज्यूस लवकर थंड होण्यासाठी मी १० मिनिट त्याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्याऎवजी थंड कलिंगड वापरल तर १० मिनिटपण वाट बघावी लागणार नाही :)
मी बीनबियांचे कलिंगड वापले त्यामुळे मला बिया वेगळे काढण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले.

चॉकलेट केक


ह्या आठवड्यात मला २ केक बनवायचे होते. एक फॉनडन्टच्या क्लाससाठी आणि एक फुलांच्या क्लाससाठी. हा केक मी फुलांनी सजवण्यासाठी बनवला. मला तो पांढऱ्या फुलांनी सजवायचा होता पण माझा आईसिंग जरा खराब झाल, मग मी हा केक महिनाभर क्लासमध्ये शिकताना बनवलेल्या फुलांनी सजवला. इथे हि सोपी केकची पाककृती देत आहे.

चॉकलेट केक
साहित्य
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ चमचा कोको पूड
१ स्पून बेकिंग पूड
३ अंडी

कृती
  • ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
  • मैदा, कोको पूड आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
  • त्यात लोणी वितळवून, साखर आणि अंडी घालुन चांगले फेटून घेणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
  • केक ३२५F/१६०C वर भाजणे
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे

टीप

मी हा केक दोनवेळा आयताकृती भांड्यात बनवला. दोन केकच्यामध्ये चॉकलेट वितळवून घालुन तो जोडला व उंच बनवला. त्यावर चॉकलेटचे बटर आईसिंग आणि रॉयल आईसिंगची फुलं लावून सजवला.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP