फ्रेंच फ्राईज


अजॉयला फ्रेंच फ्राईज खायला आवडते. त्यामुळे आम्ही रेडी टू फ्राय वाले बऱ्याचड आणून भाजून खालले आहेत. पण बरेच दिवसापासून मला ते घरी बनवण्याची फार इच्छा होती. प्रत्येक वेळी त्याला लागणाऱ्या रेफ्रीजरेशनच्या वेळेमुळे राहून जायचे. पण मागच्या शनिवारी मी शेवटी कमीत कमी वेळेत बनवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि ते एकदम चांगले झालेले. इथे पाककृती देत आहे.


फ्रेंच फ्राईज
साहित्य
२ बटाटे
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • बटाट्याची साले काढून त्याचे आयताकृती तुकडे करणे.
  • थंड पाण्याखाली स्वतच धुवून घेणे. पाणी स्वत्च येईपर्यंत बटाटे धुतले पाहिजेत.
  • बटाटे थंड पाण्यात ५-१० मिनिटे बुडवून ठेवणे.
  • पाणी काढून टाकून बटाटे टॉवेलवर पसरवून सुखवणे
  • तेल गरम करून त्यात सोनेरी रंग येईपर्यंत भाजणे व टॉवेल वर पसरवणे.
  • खायला देण्याच्याआधी पुन्हा तेल गरम करून त्यात फ्राईज सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे.
  • टॉवेलवर पसरवून त्यावर मीठ घालुन खायला देणे.

टीप
जर पाहुण्यांना देण्यासाठी बनवायचे असतील तर फ्राईजना एकदा भाजून फ्रीजमध्ये ठेवून देणे व आयत्यावेळी पुन्हा भाजून खायला देणे.
दोन वेळा भाजण्यानी बटाटे शिजतात, त्यातले पाणी निघून जाते व ते कुरकुरीत बनतात.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP