कचोरी


बरेच दिवसांनी मी काहीतरी वेगळे बनवण्याचे ठरवले. माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी तयार केलं आणि बऱ्यापैकी चांगला झालेला.

कचोरी
साहित्य
१ वाटी मुग डाळ
२ वाटी मैदा
२ चमचा रवा
२ चमचे तिखट
१ चमचा आमचूर पूड
१ चमचा गरम मसाला
१ चमचा बडीशेप
१ चमचा म्हवरी
१ चमचा जिरे
मीठ
साखर
तेल

कृती
 • मुग डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे.
 • सकाळी मुग डाळ पाण्याविना मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेणे.
 • कढईत ४-५ चमचे तेल गरम करून त्यात म्हवरी आणि जीऱ्याची फोडणी करणे.
 • त्यात मुग डाळ घालुन ताट ठेवून शिजवणे.
 • मिश्रण सुकले की त्यात तिखट, मसाला, आमचूर पूड, बडीशेप, साखर आणि मीठ घालुन ढवळणे.
 • मिश्रण पूर्णपणे सुकेपर्यंत शिजवणे.
 • परातीत मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून त्यात अर्धा वाटी गरम तेल घालणे.
 • त्यात थोये पाणी घालुन मऊसर पीठ मळणे.
 • लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याच्या वाट्या बनवणे
 • त्यात चमचाभर डाळीचे मिश्रण घालुन वाटी बंद करणे. हलक्या हातानी दाबून कचोरीचा आकार देणे.
 • तेलात मध्यम आचेवर तळून घेणे.

टीप
मुग डाळ मिश्रण बारीक वाटू नये व त्यात वाटणा पाणी नसावे म्हणजे कचोरी चांगल्या होतात.

पुदिना चटणी


तंदुरी चिकनबरोबर वाढली जाणारी पुदिन्याची चटणी मला फार आवडते. हा माझा प्रयोग आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला.

पुदिना चटणी
साहित्य
१ वाटी पुदिना
२ चमचे कोथिंबीर
२ वाटी दही
मीठ

कृती
 • पुदिना आणि कोथिंबीर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणे
 • वाटलेला पुदिना गाळून त्याचे पाणी घ्यावे.
 • एका भांड्यात दही, मीठ आणि गाळलेले पाणी एकत्र करणे.

टीप
दही एकदम घट्ट वापरावे कारण पुदिन्याचे पाणी मिसळल्यावर चटणी पातळ होते.

टोमाटो कॉर्न ऑमलेट


हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आणि चविष्ठ आहे. आई फक्त टोमाटो ऑमलेट करायची पाणी मी थोडासा बदलून हा कॉर्न वाला केलाय.

टोमाटो कॉर्न ऑमलेट
साहित्य
४ टोमाटो
१ वाटी कॉर्न
१ वाटी बेसन
१ चमचा तांदुळाचे पीठ
१/२ चमचा लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल

कृती
 • बेसन, तांदुळाचे पीठ आणि मीठ एकत्र करणे.
 • जीरा थोडासा कुटून घेणे व बेसनमध्ये एकत्र करणे.
 • मिक्सरमध्ये टोमाटो, अर्धा वाटी कॉर्न, हिरव्या मिरच्या आणि लसुणाची पेस्ट घालुन एकत्र वाटणे.
 • हे मिश्रण बेसनमध्ये घालुन चांगले ढवळून घेणे. लागल्यास थोडे पाणी घालावे.
 • उरलेला कॉर्न घालुन मिश्रण ढवळून घेणे.
 • तवा गरम करून त्यावर टोमाटो मिश्रण घालुन घावन काढावे.
 • तव्यावर दोन्ही बाजूनी कुरकुरीत भाजून घेणे. चटणी किंवा सॉस बरोबर खायला देणे.

टीप
ह्यात १-२ चमचे कोथिंबीर बारीक चिरून घालता येईल पण मी कोथिंबीरच्या चटणी बरोबर डोसे खायला दिले त्यामुळे कोथिंबीर डोश्यात घातली नाही.

मटार पनीर


मला पनीर फार आवडते त्यापैकी हि माझी एक आवडती कृती.

मटार पनीर
साहित्य
२०० ग्राम पनीर
१ वाटी मटार
४ टोमाटो
२ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आलं पेस्ट
१/२ चमचा हळद
१.५ चमचा तिखट
१.५ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
 • कढईत पनीर मध्यम आचेवर तळून घेणे.
 • कांदे पण गुलाबी होईपर्यंत भाजून बाजूला ठेवणे.
 • मटार पाण्यात शिजवून बाजूला ठेवणे.
 • मिक्सरमध्ये टोमाटो, आणि शिजवलेला कांदा घालुन वाटून घेणे.
 • कढईत तेल घालुन त्यात वाटलेले मिश्रण घालणे.
 • त्यात हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, आले आणि लसूण पेस्ट घालुन चांगले ढवळणे.
 • मिश्रण ५-६ मिनिट शिजवणे आणि लागल्यास थोडे पाणी घालणे.
 • त्यात पनीरचे तुकडे, मटार आणि मीठ घालुन पुन्हा २-३ मिनिट शिजवणे. चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
पनीर मऊ करण्यासाठी, तळलेले पनीर गरम पाण्यात घालुन पनीर खाली जाऊ देणे आणि मग त्याचा वापर करणे.

चॉकोचीप ब्रावनी


२ दिवसांपूर्वी मी ऑफिसमध्ये ब्रावनी खाऊन आल्यावर आज त्यांना घरी बनवण्याचा निर्णय घेतला. थोड फार इंटरनेटवर शोधून विविध कृती एकत्र करून मी हे ब्रावनी बनवलेत.

चॉकोचीप ब्रावनी
साहित्य
८० ग्राम डार्क चॉकलेट बार
४० ग्राम दुधाचे चॉकलेट बार
१ वाटी लोणी
२ अंडी
१.५ वाटी मैदा
३ चमचे कोका पूड
१/२ वाटी पिठी साखर
१ चमचा बेकिंग पूड
मीठ

कृती
 • एका भांड्यात पाणी उकळत ठेवणे. त्यावर दुसरे भांडे ठेवून त्यात लोणी, डार्क चॉकलेट आणि अर्धे दुधाचे चॉकलेट घालुन वितळवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
 • एका भांड्यात अंडी आणि साखर घालुन फेटून घेणे.
 • त्यात आधी वितळवलेले चॉकलेट घालुन फेटणे.
 • मैदा, बेकिंग पूड आणि कोका पूड एकत्र ८-१० वेळा चाळून घेणे.
 • अंड्याच्या मिश्रणात १-२ चमचे एकावेळी असे करत मैद्याचे मिश्रण घालुन एकत्र करणे.
 • उरलेले चॉकलेट चिरून बारीक बारीक तुकडे करणे व मिश्रणात घालणे.
 • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
 • केकच्या भांड्याला लोणी लावून त्यावर बटर पेपर घालणे. केकचे मिश्रण भांड्यात ओतून केक ओव्हन मध्ये ३५०F/१८०C वर ३०-३५ मिनिट भाजणे.
 • खायला देताना ब्रावनी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस बरोबर देणे.

टीप
मैदा आणि कोको पूड चांगली एकजीव झाली पाहिजे त्यामुळे जितक्या जास्त वेळा चाळाल तेवढा चांगलं.
ब्रावनीमध्ये अक्रोडचे तुकडे घालुन अक्रोड ब्रावनी पण करता येईल

ब्रेड रोल


ब्रेड रोल हा एक सोपा आणि चविष्ठ नाश्ता प्रकार आहे. पियुष काल आमच्याकडे आलेला होता तेंव्हा मला हा एकदम बनवण्यासाठी योग्य पदार्थ वाटला.
ब्रेड रोल
साहित्य
२ बटाटे
६ ब्रेड स्लाईस
१ चमचा जीरा पूड
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
२ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल

कृती
 • बटाटे कुकरमध्ये शिजवून घेणे.
 • बटाटे कुस्करून त्यात जीरा पूड, तिखट, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालुन मळून घेणे.
 • ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या कडा कापून टाकणे.
 • एका भांड्यात पाणी भरून त्यात एक एक स्लाईस घालुन लगेच बाहेर काढणे. लगेच हातावर दाबून पाणी काढून टाकणे.
 • बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा लांब गोळा करून ब्रेड स्लाईसवर ठेवून ब्रेड स्लाईसच्या कडा एकत्र करून सगळ्या बाजूनी बंद करणे.
 • तेलात मध्यम आचेवर तळून टोमाटो केचपबरोबर खायला देणे.

टीप
बटाट्याच्याऎवजी दुसरे मिश्रण घालुन पण हे रोल बनवता येतील.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP