बीट आणि गाजराचे कटलेट


घरात असलेले भरपूर गाजर आणि बीट संपवायचे होते आणि काहीतरी चमचमीत खाण्याची हुक्की आल्यानी मी हे कटलेट बनवले.

बीट आणि गाजराचे कटलेट
साहित्य
२ बीट
६ गाजर
२ ब्रेडचे तुकडे
१ कांदा
१ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१ चमचा आलं लसूण पेस्ट
ब्रेडक्रम्स किंवा बारीक रवा
तेल
मीठ

कृती
  • गाजर आणि बीट किसून घेणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, तिखट घालुन ढवळणे.
  • त्यात किसलेले गाजर आणि बीट घालुन मिश्रण शिजवणे.
  • त्यात मीठ व ब्रेडच्या तुकड्यांचा चुरा करून घालुन ढवळणे व थंड होण्यासाठी ठेवणे.
  • मिश्रणाचे लांबट गोळे करून रवा किंवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तव्यावर थोडेसे तेल घालुन भाजणे.

टीप
कटलेटमध्ये बटाटे किंवा घेवडा पण घालता येईल

तळलेले मोदक


आज मी पुरण पोळी बनवण्याचे ठरवले पण पोळीच्या कडांना पुरण पोचले नाही. २-३ वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी मी पुरण पोळीच्याऎवजी मोदक केले.

तळलेले मोदक
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
१/२ वाटी गुळ
४ चमचेभरून गव्हाचे पीठ
२ चमचाभरून मैदा
मीठ
तेल

कृती
  • डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे व त्यातले पाणी काढून टाकणे.
  • एका कढईत शिजलेली डाळ आणि गुळ घालुन ५-६ मिनिट शिजवणे.
  • गव्हाचे पीठ, मैदा आणि एक चमचा गरम तेल एकत्र करून पीठ भिजवणे. अर्धा तास बाजूला ठेवून देणे.
  • पीठ्चे छोटे गोळे पुरीच्या आकाराचे लाटणे.
  • प्रत्येक पुरीवर पुरण पसरवून निऱ्या काढून मोदक बंद करणे.
  • तेलात मध्यम आचेवर मोदक तळून घेणे.

टीप
हे मोदक पुराणाचे असल्यानी ते २-३ दिवस चांगले राहतात.
मोदक जिथे बंद करतो ती बाजू पण चांगली भाजणे अथवा तिथे कच्चे राहण्याची संभावना जास्त आहे.

उकडीचे मोदक


गणेश चतुर्थी असल्यानी मी मागच्या आठवड्यात मोदक बनवण्याचे ठरवलेले पण पुण्याला सरप्राईज देण्यासाठी गेल्यानी ते राहून गेले. पण म्हणून मी आज वेळ मिळताच लगेच मोदक बनवायला घेतले.

उकडीचे मोदक
साहित्य
१ वाटी किसलेला नारळ
३/४ वाटी गुळ
१.५ वाटी पाणी
१ वाटी तांदुळाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे आणि गुळ घालणे.
  • साधारण ५-७ मिनिटांनी गुळ विरघळून खोबर्याचे मिश्रण तयार होईल.
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तेल आणि मीठ घालणे.
  • त्यात तांदुळाचे पीठ घालुन चांगले ढवळून घेणे.
  • मिश्रण आचेवरून काढून मळणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून ते पातळ लाटणे
  • त्यावर चमचाभर मिश्रण घालुन निऱ्या काढून मोदक बंद करणे.
  • भांड्यात पाणी उकळवणे व त्यावर दुसरे भांडे ठेवणे. भांड्यावर पंचा पसरवून त्यावर सगळे मोदक ठेवणे. मोदकांना पंच्यानी झाकून ७-१० मिनिट शिजवणे.

टीप
खोबर्याचा हा पदार्थ जास्त टिकत नाही त्यामुळं एक - दोन दिवसात संपवणे.

कॉलीफ्लॉवर पराठे


आज एकदम मस्त ताजा ताजा कॉलीफ्लॉवर मिळाला आणि मी हे पराठे बनवण्याचे ठरवले. एकदम मस्त झालेले.

कॉलीफ्लॉवर पराठे
साहित्य
६ चमचेभरून गव्हाचे पीठ
१ कॉलीफ्लॉवर
१ कांदा
१ चमचा जिरे
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१ चमचा आमचूर पूड
तेल/तूप
मीठ

कृती
  • चपातीला भिजवतात तसे गव्हाचे पीठ भिजवून घेणे.
  • फ्लॉवर आणि कांदा किसून घेणे.
  • त्यात मीठ घालुन १० - १५ मिनिट पाणी सुटण्यासाठी ठेवून देणे.
  • त्यातून पाणी काढून टाकून त्यात जीरा, तिखट, हळद आणि आमचूर पूड घालुन मिश्रण बनवणे.
  • गव्हाच्या पीठाचे गोळे बनवून वाटी बनवणे व त्यात आधी बनवलेले मिश्रण घालुन बंद करणे.
  • पराठा अलगद लाटून घेणे व मध्यम आचेवर तव्यावर तेल किंवा तूप घालुन भाजून घेणे.

टीप
फ्लॉवर ताजा नसेल तर कढईत मिश्रण घालुन फ्लॉवर शिजेपर्यंत ढवळत मध्यम आचेवर ठेवणे.
मिश्रणात उकडलेला बाटतात कुस्करून घातला तर आलू गोबी पराठा पण बनवता येईल
मी परतः भाजताना एक बाजू तेलानी आणि एक बाजू तूप लावून भाजते.

शेंगदाणा लाडू


लाडूमध्ये मला फार कमी प्रकार आहेत जे आवडतात पण हा सगळ्यात जास्त आवडीचा लाडू. आईला विचारून मी हा लाडू बनवला आणि सगळ्यात सोपा हा लाडू इथे देत आहे.

शेंगदाणा लाडू
साहित्य
३ वाटी शेंगदाणा
१/२ वाटी गुळ

कृती
  • कढईत शेंगदाणे भाजून घेणे.
  • शेंगदाण्याची साल काढून मिक्सर मध्ये बारीक पूड करणे.
  • त्यात चिरलेला गुळ घालुन पुन्हा वाटणे.
  • लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.

टीप
शेंगण्याची साल काढण्याचा मला फार कंटाळा येतो त्यामुळे मी सालासकटच शेंगदाणे वाटते, चव फार काही बदलत नाही

नटी राईस


एका वाढदिवसाला ताज बंगलारूमध्ये मी नटी राईस खालेला. एकदम चविष्ठ. अजॉय आणि मला दोघानाही खूप लगेच आवडला. खातानाच मी घरी कसा बनवायचा विचार करायला चालू केलेला आणि पहिल्या प्रयत्नातच तो एकदम तसाच्या तसा बनलेला. एकदम सोपा आणि सुंदर पदार्थ.

नटी राईस
साहित्य
२ वाटी भात
४ चमचे शिजवलेले कॉर्नचे दाणे
२ चमचे शेंगदाणे
२ चमचे काजू
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा मनुका
१/२ चमचा जीरा
२ चमचे तूप
मीठ

कृती
  • कढईत तूप गरम करून त्यात जिरे फोडणी करणे.
  • त्यात काजू, शेंगदाणे आणि मनुके घालणे.
  • जेंव्हा काजू गुलाबी झाले की त्यात हिरव्या मिरच्या घालणे.
  • तयार भात, कॉर्नचे दाणे आणि मीठ घालुन ढवळणे.
  • ३-५ मिनिट वाफ काढून वाढणे.

टीप
फोडणीत ४-५ कडीपत्याची पानं घालता येतील
बासमती किंव्हा कुठलाही मोठ्या दाण्याचा भात वापरला तर भात खूप सुंदर होतो.

व्हेज स्प्रिंग रोल


हि पाककृती मी मला लग्नात मिळालेल्या एका पुस्तकातून घेतली आहे. पुस्तकाच नाव आहे 'हमाखास पाकसिद्धी'

व्हेज स्प्रिंग रोल
साहित्य
५ चमचाभरून मैदा
१ अंडे
३ गाजर
१ कोबी
२ कांदे
१ चमचा सोया सॉस
१/२ चमचा मिरे पूड
मीठ
तेल

कृती
  • मैदा, अंडे, मीठ आणि पाणी एकत्र करून पातळ भिजवणे.
  • नॉनस्टिक तव्यावर पातळ डोसे बनवणे.
  • हे सगळे डोसे एकावर एक कॉर्न फ्लॉवर पसरवून ठेवणे.
  • गाजर, कांदा आणि कोबी बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले गाजर, कोबी आणि कांदा घालुन सारखे परतत अर्धवट शिजवणे.
  • त्यात सोया सॉस, मिरे पूड आणि मीठ घालुन एकत्र करून ढवळणे.
  • अर्धा चमचा मैदा आणि थोडे पाणी एकत्र करून रोल बंद करण्यासाठी पेस्ट बनवणे.
  • प्रत्येक डोश्यावर आधी बनवलेली भाजी घालुन रोल करणे व मैद्याच्या पेस्टनी बंद करणे.
  • कढईत तेल घालुन रोल भाजणे.

टीप
डोसे एकदम पातळ बनवले पाहिजेत म्हणजे रोल एकदम कुरकुरीत होतील
छोटे छोटे डोसे बनवले तर स्प्रिंग रोल कापावे नाही लागणार व मिश्रण बाहेर येण्याचा संभाव नाही येणार.

हरभरा कबाब


हॉटेलमध्ये मला हा सगळ्यात आवडणारा पदार्थ. नेहमी वाटायचं की कबाब बनवण्यासाठी काहीतरी खास मशीन लागेल पण अजॉयला पालक खायचा म्हणून मी तव्यावर हे करून बघितले. एकदम छान झालेले.

हरभरा कबाब
साहित्य
३ बटाटे
२ वाटी मटार
२ पालक गड्डी
१ वाटी कोथिंबीर
१/२ गड्डी पुदिना
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
३ लिंबू
२ चमचा कॉर्न फ्लॉवर
२ ब्रेडचे तुकडे
३ चमचा लोणी
काजू
मीठ
तेल

कृती
  • २-३ वाटी पाणी उकळवणे व त्यात पालकाची पाने घालुन थोडा वेळ उकळवून पाणी काढून टाकणे.
  • कांदा मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • कढईत लोणी घालुन गरम करणे.
  • त्यात कांद्याची पेस्ट घालुन गुलाबी होईपर्यंत शिजवणे.
  • पालक मिक्सर मध्ये वाटून घेणे व कांद्यात घालणे व पाणी आटेपर्यंत शिजवणे व थंड करण्यासाठी ठेवून देणे.
  • बटाटे व मटार उकडून घेणे.
  • कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या वाटून घेणे व थंड केलेल्या पालक - कांदा पेस्ट मध्ये पेस्ट घालणे.
  • बटाटे किसून त्यात घालणे.
  • मटार थोडेसे ठेचून त्यात घालणे.
  • लिंबू, कॉर्न फ्लॉवर, ब्रेडचे तुकडे आणि मीठ घालणे व चांगले मळणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे करून थोडेसे दाबून त्यावर काजू लावणे.
  • तव्यावर थोडेसे तेल घालुन कबाब भाजणे व पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला देणे.

टीप
भाजलेल्या कबाबवर थोडासा चाट मसाला शिंपडलं तर आणखीन सुंदर चव येते.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP