साबुदाणा वडा आणि दहयाची चटणी


सीमा जेंव्हा आमच्याकडे आलेली तेंव्हा मी साबुदाणा वडा बनवण्याचे ठरवले. मला माहिती होता की तिला फार आवडेल ते आणि माझा अनुमान खरा ठरला. तिला फक्त आवडलाच नाही तर तिने पाककृतीपण मागितली. साबुदाणा त्यादिवशी एकदम छान भिजलेला त्यामुळे एकदम कुरकुरापण झालेला.

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा
साहित्य

१ वाटी साबुदाणा
१-२ मध्यम आकाराचे बटाटे
१ वाटी शेंगदाणा कुट
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरा
१/२ चमचा जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ वाटी कोथिंबीरीची पान
साखर
मीठ
तेल/तूप तळण्यासाठी

कृती
  • साबुदाणा धुवून ३-४ तास १/४ वाटी पाणी घालुन भिजवून ठेवावा
  • बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  • बटाटे कुस्करून त्यामध्ये भिजलेला साबुदाणा, शेंगदाणा कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून, जीरा, जीरा पूड, धने पूड, साखर आणि मीठ घालुन मळावा.
  • ह्या मिश्रणाचे छोटे चपटे वाडे बनवावे
  • तेल व्यवास्तीथ गरम करून त्यामध्ये वडे मध्यम आचेवर तेलामध्ये तळावे.
  • गरम गरमच दह्याच्या चटणीबरोबर वाढावेत

टीप
मला सकाळी ४ वाजता उठवत नाही त्यामुळे मी बहुतेकदा साबुदाणा रात्रभर भिजवते. :)
साबुदाणा चांगला भिजण्यासाठी पाण्याचे प्रमाण (१ वाटी साबुदाणा : १/४ वाटी पाणी) फार महत्वाचे आहे. आधी मला नित माहिती नसल्यामुळे वडे नेहमीच चांगले होतील अशी खात्री नसायची.
कधी तरी कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घालण्याऐवजी मिक्सरमध्ये वाटूनपण घालता येतील. चव वेगळी आणि छान येते.

दहयाची चटणी

दहयाची चटणी
साहित्य
१ वाटी दही
१/४ वाटी शेंगदाणा कुट
२ हिरव्या मिरच्या / १/२ चमचा तिखट
१/२ चमचा जीरा पूड (इच्छेप्रमाणे)
१ चमचा बारीक चिरून कोथिंबीर (इच्छेप्रमाणे)
चवीनुसार साखर
मीठ

कृती

  • साखर आणि मीठ दह्यामध्ये घालून विरघळेपर्यंत ढवळावे
  • बाकीचे साहित्य दह्यात घालुन एकसमान मिश्रण बनवावे.

टीप
वड्यामध्ये जीरा आणि धने पूड असल्यामुळे मी बहुतेकदा ऐच्छीक साहित्य वापरत नाही.
तसेच मी हिरव्या मिरची ऎवजी तिखट वापरते.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP