पोटोल भाजा


काल मी खजुराचा केक बनवण्याचा प्रयत्न केला पण एकदम अयशस्वी. कारण: केक ३५ मिनिट भाजल्यावर लक्षात आल की मी बेकिंग पावडर घालायला विसरले जे केकसाठी एकदम महत्वाचे आहे. अजॉय त्याला कुकी म्हणून खातोय. बिचारा. आज मी पोटोल भाजाची पाककृती पोस्ट करतीये. (मानी शिकवलेली). एकदम सोपी आणि चविष्ट.

पोटोल भाजा
साहित्य
पोटोल
तिखट
मीठ
तेल

कृती
  • सगळे पोटोल अर्धे कापावे
  • त्यांना मीठ आणि तिखट लावून १५- २० मिनिट बाजूला ठेवावे
  • तेल गरम करून पोटोल त्यामध्ये भाजावे

टीप
असेच वांगे किंवा केळे यांचे पण भाजा बनवता येईल

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP